नागरिक गस्तीला आणि चोर वस्तीला’ अशी ढालेवाडी, लगंरपेठ परिसराची अवस्था

कवठेमहांकाळ (प्रतिनिधी)
ढालेवाडी लगंरपेठ ढालगाव व परिसरामध्ये सध्या नागरिक गस्तीला आणि चोर वस्तीला अशी अवस्था झाली असून गेले पंधरा दिवसापासून कवठेमहाकाळ शहरात चोरानी धुमाकूळ घातला असून शहरातील प्रत्येक ठिकाणी नागरिक गस्त घालताना दिसून येत आहे. गेले अनेक दिवसापासून गावात व शहरांमध्ये विविध भागात चोर आल्याची घटना घडल्या जात असून यामुळे नागरिक एकत्र येऊन चोराचा शोध घेत आहेत. मात्र अजून चोर आढळून आलेला नाही.
यामध्ये ढालगाव नागज ढालेवाडी, लगंरपेठ,नागोळे,अलकुड,इरळी, डोरली चौरोची भागात चोर आल्याच्या अफवा पसरल्या गेल्या आहेत, कारण गस्त घालणारे २५ ते ३० लोकांना चोर आल्याची माहिती मिळते. परंतु अजुन त्यांना चोर सापडला नसल्याने सध्या नागरिक गस्तीला व चोर वस्तीला अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच कवठेमहाकाळ पोलिसांची संख्याबळ कमी असल्याने तसेच त्यांच्याकडे अनेक गावे येत असल्याने सध्या पोलीस ठाण्यामध्ये पोलिसांची संख्या वाढवण्याची मागणी शहरातील नागरिक जिल्हा पोलिस प्रमुख यांच्याकडे करणार आहेत. सांगली जिल्हा प्रमुख संदीप घुगे यांनी यापूर्वीच चोरीच्या अफवांवर विश्वास ठेवू नका तसेच काही लोकांच्या हालचाली संशयास्पद वाटल्या तर त्याची माहिती पोलिसांना द्यावी.
याबाबतचा संपर्क नंबरही त्यांनी यापूर्वी प्रसिद्ध केला आहे. या घटनेमुळे सध्या कवठेमहाकाळ शहरात नागरिक रात्री ग्रुप करून गस्त घालत असल्याचे दिसून येत आहे. काही ठिकाणी चोर आला चोर आला अशी हाक येतात त्या ठिकाणी जाऊन पाहतात तर चोर आढळून आलं नसल्याचे दिसून येत आहे. यावरून सध्या आता शहरात नागरिक गस्तीला तर चोर वस्तीला अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

About The Author