श्री बिरेश्वर को-ऑप क्रेडिट सोसायटीच्या पलूस शाखेचे उदघाटन

सांगली (प्रतिनिधी)

श्री बिरेश्वर को-ऑप क्रेडिट सोसायटी लि. एक्संबा (मल्टीस्टेट) च्या २१४ व्या शाखेचा उदघाटन समारंभ पलूस येथील फैशन कॉर्नर कासारवाडा रोड, होमकर तात्या कॉम्प्लेक्स श्री पुज्य शिवदेव स्वामीजी यांच्या हस्ते झाला.

कर्नाटक राज्यातील चिकोडीचे माजी खासदार व संस्थापक अण्णासाहेब जोल्ले, सह संस्थापिका माजी कनाटक मंत्री,निपाणीच्या विद्यमान  आमदार शशिकला जोल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली श्री बिरेश्वर को-ऑप क्रेडिट सोसायटीची वाटचाल प्रगतीपथावर आहे. संस्थेच्या महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, महाराष्ट्र राज्यात एआहे.212 शाखा मध्ये विस्तार झालेला आहे. संस्थेचे सुमारे ३ लाख ८९ हजार सभासद असून, ३ हजार ९२५ कोटी ठेवी आहेत. 

यावेळी स्वागत संस्थेचे कर्मचारी अंकुश पूजारी यांनी केले. संजय बोरगावे यांनी संस्थेच्या वाटचालीचा आढावा घेतला. यावेळी कार्यक्रमास पलूस नगरपरिषदेचे गटनेते सुहास पुदाले, कुस्ती कमिटीचे अध्यक्ष भरतसिंह इनामदार, अॅड चंद्रकांत फाळके, आर. एस. एस. चे पलूस तालुका कार्यवाह संग्राम कुलकर्णी, शिवसेना शहर प्रमुख ऋषिकेश सोनवणे, उद्योजक शरद सिसाळ, संस्थेचे उपप्रधान व्यवस्थापक शिवपुत्र डब, विपुल बेळंकी, दिलीप मोहिते, व शाखा व्यवस्थापक नितीन पाटील, संस्थेचे सर्व कर्मचारी यांच्यासह पलूस येथील व्यापारी, उपस्थित होते. आभार विपुल बेळंकी यांनी मानले.

About The Author