काँग्रेस पक्षाच्या विधानसभा इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती संपन्न
सांगली (प्रतिनिधी)
अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने विधानसभा निवडणुक लढविण्यास इच्छुक असलेल्या सांगली जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या मुलाखती आज शुक्रवारी काँग्रेस भवनमध्ये पार पडल्या. यावेळी सांगली शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील व ग्रामीण जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार विक्रमसिंह सावंत यांनी स्वागत केले. प्रारंभी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या पुण्यतिथीनिमित्त खासदार प्रणितीताई शिंदे यांच्या हस्ते सुती पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
सांगली जिल्हा विधानसभा क्षेत्राच्या काँग्रेस पक्षाच्या निरीक्षक खा. प्रणितीताई शिंदे यांनी जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या.
यावेळी खासदार विशाल दादा पाटील उपस्थित होते. इच्छुकांमध्ये सांगली विधानसभा मतदारसंघातून शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील व श्रीमती जयश्री पाटील, मिरजेतून मोहन वनखंडे, सी. आर. सांगलीकर, धनराज सातपुते, शशिकांत बनसोडे, दयाधन सोनवणे, रविंद्र कोलप, नंदादेवी कोलप, अरुण धोतरे
इस्लामपूरमधून मनिषा रोटे व जितेंद्र पाटील, शिराळ्यातून रवी पाटील, खानापूर – आटपाडीमधून रविकांत भगत व गजानन सुतार आणि जतमधून आमदार विक्रमसिंह सावंत व तुकाराम माळी यांनी मुलाखती दिल्या. मुलाखतीचा अहवाल निरीक्षक खासदार प्रणितीताई शिंदे प्रदेश काँग्रेस कमिटीकडे सादर करणार आहेत. यावेळी सांगली जिल्ह्य़ातील काँग्रेस पक्षाच्या विविध सेल, विभाग व आघाड्यांचे पदाधिकारी व काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.