जयंत पाटील यांचा विजय एक लाख मताधिक्याने निश्चित : विशाल शिंदे, विद्या शिंदे

आष्टा प्रतिनिधी :डॉ तानाजी टकले
आम जयंतराव पाटील व मा आ स्व विलासराव शिंदे यांनी हातात हात घालीत इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचा चौफेर विकास साधला आहे.महाराष्ट्र राज्याला पुढे नेण्याचे त्यांचे व्हिजन आहे. इस्लामपूर मतदार संघात ते एक लाखाच्या मताधिक्याने विजयी होतील असा विश्वास माजी उपन्गराध्यक्ष विशाल शिंदे व विद्याताई शिंदे यांनी व्यक्त केला. प्रभाग एक मधील मतदारांच्या गाठी भेटी वेळी आयोजित कोपरा सभेत ते बोलत होते. विश्वराज शिंदे, सुनीता घोरपडे, प्रमुख उपस्थित होते.


विशाल शिंदे म्हणाले,मतदार संघातील सर्व सामान्य जनताआमदार जयंतराव पाटील साहेब यांच्या पाठीशी आहे.आमदार जयंतराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली राजारामबापू पाटील सहकारी कारखान्याने एफआरपीपेक्षा अधिक दर देण्याची परंपरा कायम राखली आहे. उसाला चांगला दर देण्याचा प्रयत्न सातत्याने
जयंतराव पाटील यांनी केला आहे. राज्यातील अनेक नेते मंडळींनी खाजगी साखर कारखाने काढले आहेत, मात्र जयंतराव पाटील यांनी सहकारी साखर कारखाने काढले आहेत. इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचा शाश्वत विकास करण्याचे काम त्यांच्याकडून झाले आहे. त्यामुळेच सात वेळेला मतदारसंघातील सर्वसामान्य जनता जयंतराव पाटील यांच्या पाठीशी राहिली आहे. यावेळी ही जनता
निश्चितपणे साहेबांच्या पाठीशी राहील.

विरोधकांकडे आरोप करण्यापलीकडे काहीही नाही. साहेबांच्याकडे आरोपापेक्षा विकास आहे. जयंतराव पाटील हेच आमचे एक चिन्ह आहे. त्यामुळे त्यांचे तुतारी
वाजवणारा माणूस हे चिन्ह घराघरात पोहोचले आहे. तुतारी वाजवणारा माणूस या समोरच बटन निवडणुकीत दाबले जाईल इतकी सुज्ञ जनता या तालुक्यात आहे. चिन्हाचा कसलाही परिणाम साहेबांचे मताधिक्य घटनेत होणार नाही. आमदार जयंतराव पाटील साहेब यांच्या माध्यमातून वाळवा तालुक्यातील कृषी, औद्योगिक,शैक्षणिक आणि सहकार क्षेत्राचा मोठा विकास झाला आहे.

About The Author