नारी शक्तीच्या सन्मानासाठी जयश्री पाटील यांना निवडून आणणार – नांद्रेत ग्रामस्थ महिलांचा निर्धार

नांद्रेची जनता दादा घराण्याच्या पाठीशी ठाम राहणार

सांगली (प्रतिनिधी) 

नांद्रे येथे आज विधानसभा मतदार संघाच्या अपक्ष उमेदवार जयश्री पाटील यांचा  प्रचाराचा शुभारंभ धूमधडक्यात मारुती मंदीर मध्ये संपन्न झाला. नारीशक्तीच्या सन्मानासाठी जयश्री पाटील यांना निवडून आणण्याचा निर्धार ग्रामस्थ आणि महिलांनी व्यक्त केला. सांगली  विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार जयश्री मदन पाटील  यांच्या प्रचारार्थ नांद्रे येथे काॅर्नर सभा व रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी “सरकारी निधीतून पैसा लुटा आणि स्वत:ची घरे भरा” असाच कारभार महायुतीचा चालू आहे. सध्याच्या महायुती सरकारच्या कामामुळे महाराष्ट्र दहा वर्षे पिछाडीवर पडला आहे. अशा भ्रष्ट महायुतीचा विधानसभा निवडणुकीत पराभव करा असे आवाहन ज्येष्ठ नेते एन एस पाटील यांनी केले. सभेवेळी बोलताना सरपंच सौ पुजा भोरे म्हणाल्या की, आम्हा महिलांना 33% आरक्षण असुन सुध्दा पक्षांनी जाणीवपूर्वक जयश्री पाटील यांना पक्षांची उमेदवारी डावलण्यात आली आहे. म्हणुन “आम्ही करु नारी शक्तीचा सन्मान आता सांगलीत महिला आमदार” हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून कामाला लागलो आहे. जयश्री पाटील यांना विधानसभेत पाठवून इतिहास घडवू असा निर्धार करण्यात आला.

यावेळी जेष्ठ नेते एन एस पाटील. बाळगोंडा पाटील,  सरपंच पुजा भोरे,  उपसरपंच अमित पाटील,  नावरसवाडीचे शिवाजी चव्हाण,  सोसायटीचे चेअरमन मनोज पाटील,  अमित पाचोरे,  अमोल पाटील , महावीर भोरे , राजगोंडा पाटील,  चंद्रशेखर शेट्टे,  प्रदीप मदने,  रतन तोडकर,  सुरज मुल्ला , सत्तार  मुजावर,  भरत पाटील,  शशिकांत ऐडके,  तानाजी माने , सागर पाचोरे,  प्रकाश चौधरी,  सुशांत माने, शितल कोथळे,  संजय कोथळे,  डाॅ प्रविण पाटील,  ग्रामपंचायत सदस्या शालन पोचोरे, डाॅ हेमलता वाले , सौ दिपाली साळुंखे, मयुरी चौगुले, प्रशिक काकडे, ग्रामपंचायत सदस्य , सदस्यां याच्यासह गावातील पदाधिकारी ग्रामपंचायत सदस्य, दर्गा कमिटी, जैन कमिटीचे ,  पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author