कर्मवीर पतसंस्थेचे सामान्य माणसाला उभे करण्याचे कार्य कौतुकास्पद : पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर

सांगली (प्रतिनिधी)

समाजातील चांगल्या मंडळींची पुरस्कारासाठी निवड करून त्यांचे काम सर्वांच्या पुढे आणण्याच काम कौतुकास्पद कार्य कर्मवीर पतसंस्था करीत आहे. असे कौतुकोद्गार ज्येष्ठ अणूशास्त्रज्ञ आणि भारतीय अणुउर्जा महामंडळाचे माजी अध्यक्ष पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर यांनी काढले. कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्था व कर्मवीर चॅरीटेबल ट्रस्ट यांच्यावतीने आयोजित कर्मवीर भूषण वितरण सोहळा त्यांच्या अमृतहस्ते संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी भारती विद्यापीठाचे कुलपति प्रा. डॉ शिवाजीराव कदम अध्यक्षस्थानी होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस दिपप्रज्वलन व कर्मवीर आण्णांच्या प्रतिमा पुजनाने झाली. स्वागत व प्रास्ताविक कर्मवीर पतसंस्थेचे चेअरमन रावसाहेव पाटील यांनी केले. त्यांनी संस्थेच्या सामाजिक व आर्थिक कार्याची माहिती दिली. कार्यक्रमाच्या मान्यवरांचे संस्थेच्या पदाधिकारी यांच्यावतीने स्वागत करण्यात आले.

डॉ. काकोडकर पुढे म्हणाले, कर्मवीर आण्णांनी शिक्षणाच्या माध्यमातून समाजासाठी केलेल्या कामाला जगाच्या इतिहासात जोड नाही. ते विचार घेऊन कर्मवीर पतसंस्था समाजातील सामान्य माणसाला आर्थिक उभारी देण्यासाठी चांगले कार्य करीत आहे. वर्क फ्रॉम होत असेल तर वर्क फ्रॉम व्हीलेज सुद्धा होवू शकते. आपल्या तरुणांनी शहराकडे जाण्याची आवश्यकता भासणार नाही. आपल्याकडे खुप संसाधने असल्यामुळे शहरातील माणसे खेड्‌याकडे येतील त्यातून अर्थव्यवस्थेला गती मिळेल. यामध्ये कर्मवीर पतसंस्था मोठे योगदान देवू शकते असा विश्वास त्यांनी या पुरस्कार वितरण सोहळयात व्यक्त केला.

यावेळी आ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांना कर्मवीर कृषीभूषण, प्रा. डॉ. डी. डी. चौगुले यांना कर्मवीर विद्याभूषण व उद्योजक श्री. योगेश लक्ष्मण राजहंस यांना कर्मवीर उद्योगभूषण पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. यावेळी कर्मवीर चॅरीटेबल ट्रस्ट च्या वतीने मुकबधीर मुलांच्या शाळेस रु.१ लाखाच्या मदतीचा धनादेश प्रदान करण्यात आला. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या उपकरणांच्या स्टॉलला डॉ. काकोडकरांनी भेट देवून त्यांचे कौतुक केले.

यावेळी कर्मवीर चॅरीटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष ओ. के. चौगुले (नाना), कार्यवाह लालासाहेब थोटे, संस्थेचे व्हाईस चेअरमन डॉ. अशोक सकळे, संचालक डॉ. रमेश वसंतराव ढबू, वसंतराव नवले, डॉ. एस.बी. पाटील (मोटके), डॉ. चेतन पाटील, संचालिका भारती चोपडे, सौ. चंदन केटकाळे, संचालक आप्पासाहेब गवळी, बजरंग माळी, अमोल रोकडे, तज्ञ संचालक डॉ. नरेंद्र खाडे, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल मगदुम उपस्थित होते. आभार संचालक ऍड. एस.पी. मगदूम यांनी मानले.

About The Author