कर्नाटक राज्याचे पणन संचालक शिवानंद कापसे यांची सांगली बाजार समितीस भेट
सांगली (प्रतिनिधी)
सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती सांगलीचे वसंतदादा मार्केट यार्ड सांगली येथे कर्नाटक राज्याचे पणन संचालक शिवानंद कापसे (आय.ए.एस.) यांनी सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी त्यांनी बाजार आवारातील विविध दुकानांना भेट देऊन बाजारातील आवक होणाऱ्या शेतमालांचे सौदे, बिले पट्ट्या विषयी माहिती जाणून घेतली.
हळद, गुळ, बेदाणा धान्य व्यापारांशी त्यांनी चर्चा केली तसेच सांगली बाजार समितीने शेतकरी, व्यापारी यांच्या सोयी सुविधी विषयी व समितीचे कामकाजा बाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. याप्रसंगी सांगली बाजार समितीचे संचालक संग्राम पाटील ,व्यापारी प्रतिनिधी प्रशांत पाटील मजलेकर, काडाप्पा वारद, कर्नाटक राज्याचे अतिरिक्त पणन संचालक के. एम. नागेश, जॉईंट डायरेक्टर रमेश व्ही., सांगली बाजार समितीचे सचिव महेश चव्हाण, विजापूर व निपाणी बाजार समितीचे सचिव शिवानंद तसेच बाजार समिती सांगलीचे व्यापारी आदी उपस्थित होते.