आंतरराष्ट्रीय कुस्तीस्पर्धेत कस्तुरी कदमची रौप्य पदकाला गवसणी

  कसबा बीड (वार्ताहर):- शिरोली दुमाला तालुका करवीर येथील आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू खेळाडू कु. कस्तुरी सागर कदम हिने थायलंड येथे झालेल्या आशियाई महिला कुस्ती स्पर्धेत १५ वर्षाखालील ३९ किलो वजनी गटातून खेळताना रौप्य पदकाला गवसणी घातली.

 कस्तुरी कदम हिने नुकतीच हरियाणा येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून आशियाई महिला कुस्ती स्पर्धेसाठी आपली पात्रता सिद्ध केली होती. आशियाई महिला कुस्ती स्पर्धेत अंतिम सामन्यात तिला जपानच्या सेरा फुरुईचीकडून पराभव पत्करावा लागला. यामुळे तिला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. कस्तुरीला कै. सचिन पाटील कुस्ती संकुलातून कुस्तीचे धडे मिळाले होते. यासाठी तिला कै. सचिन पाटील कुस्ती संकुलाचे मार्गदर्शक व संचालक पै. श्री.नितीन शिवाजीराव पाटील सर व पै. श्री. विकास पाटील सर तसेच तिचे वडील सागर कदम यांचे ही मार्गदर्शन लाभले . यावेळी सर्व शिरोली ग्रामस्थ यांच्या वतीने कस्तुरी कदम यांचे भव्य स्वागत करण्यात आले.

About The Author