केडीसीसी बँकेने पीक कर्ज मर्यादा वाढवावी:- शिरोली सेवा संस्थेचा ठराव
टोप (प्रतिनिधी) जिल्हा मध्यवर्ती बँकेने एकरी पीक कर्ज मर्यादा वाढवावी. असा ठराव शिरोली विकास सेवा संस्थेच्या वार्षिक सर्व साधारण सभेत करण्यात आला. सभेच्या अध्यक्षस्थानी चेअरमन धनाजी पाटील हे होते. हि सभा खेळीमेळीत पार पडली. पेठवडगाव बाजार समितीचे सभापती सुरेशराव पाटील, छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक दिलीपराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
सध्या केडीसीसी बँकेकडून बाराशे ते तेराशे रुपये प्रति गुंठा म्हणजे एकरी सरासरी ४५ हजार रुपाने प्रमाणे पीक कर्ज दिले जाते. या पीक कर्जातून मशागत,रासायनिक खते, बी बियाणे, औषध फवारणी ,भांगलण, पाणीपट्टी इत्यादींचा खर्च भागवावा लागतो. हा खर्च जिल्हा बँकेच्या सध्याच्या पीक कर्जातून भागवणे अवघड झाले आहे. त्यामुळे जिल्हा बँकेने यामध्ये वाढ करून कर्जपुरवठा करावा अशी मागणी शेतकऱ्यांच्यातून करण्यात आली. नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सानूग्रह अनुदान तात्काळ मिळावे. तसेच पुरामुळे नुकसान झालेल्या पीकांची नुकसान भरपाई २०१९ प्रमाणे द्यावी. असा ठराव करण्यात आला . पाणीपट्टीमध्ये वाढ न करता पूर्वीप्रमाणे सात हजार रुपये इतकीच ठेवण्याचा ठराव झाला. तसेच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लागू केल्याबद्दल महाराष्ट्र शासनाचा अभिनंदनचा ठराव करण्यात आला.
यावेळी बाजीराव पाटील, राजेश पाटील,नारायण मोरे, मनोहर लंबे, उदय पाटील, आण्णा पाटील, मारुती वंडकर, अण्णासो सावंत आदींनी अहवाल बाबत चर्चेत भाग घेतला.
यावेळी नुतन उपसरपंच बाजीराव पाटील, पंचगंगा पाणी पुरवठा चेअरमन राजेश पाटील, फौजदार किसन खानू पुजारी, फौजदार सागर तानाजी मोरे,नितीन चव्हाण, अग्णीवीर ऋषीकेश प्रकाश माजगावकर, कोतवाल संदीप धोंडीराम पुजारी, विज तंत्रज्ञ अशोक कोळी,सचिव नंदकुमार पाटील आदींचा विशेष सत्कार करण्यात आला.