कोल्हापूरचे नवे जिल्हाधिकारी अमोल येडगे

कोल्हापूर (प्रतिनिधी)
कोल्हापूरचे नवे जिल्हाधिकारी म्हणून अमोल येडगे यांची नियुक्ती झाली आहे. ते 2014 च्या बँचचे आयएएस आहेत.

श्री.अमोल येडगे हे मूळचे अंबाईचीवाडी ता.कराड, जिल्हा सातारा येथील असून ते यापूर्वी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे येथे संचालक म्हणून कार्यरत होते, यापूर्वी त्यांनी यवतमाळ आणि बीड येथे काम केले आहे. कोल्हापूरचे सद्याचे जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांची बदली महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,पुणे येथे संचालक म्हणून करण्यात आली आहे.

About The Author