रोहित शर्मा की मोहम्मद नबी, कोण बरोबर? आर अश्विनने अफगाणिस्तानच्या फलंदाजाला दिली साथ; पाहा काय म्हणाला

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील शेवटच्या सामन्यादरम्यान भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि अफगाणिस्तानचा फलंदाज मोहम्मद नबी यांच्यात सुपर ओव्हरमध्ये वाद झाला. ही चर्चा पहिल्या सुपर ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर नबीने काढलेल्या तीन धावांची होती.

बुधवारी (१७ जानेवारी) खेळल्या गेलेल्या टी-२० सामन्याच्या पहिल्या सुपर ओव्हरमध्ये अफगाणिस्तानचा संघ फलंदाजी करत असताना, मोहम्मद नबीने शेवटच्या चेंडूवर बॅट स्विंग केली पण तो चुकला आणि चेंडू संजू सॅमसनकडे गेला. इकडे नबी धाव घेण्यासाठी धावला आणि संजूने तो गोलंदाजाच्या दिशेने फेकला. हा थ्रो नबीच्या पायाला लागला आणि चेंडू दुसऱ्या बाजूला गेला. अशा स्थितीत नबीने आणखी दोन धावा काढल्या. म्हणजे जिथे एक धाव मिळणे अपेक्षित नव्हती तिथे तीन धावा झाल्या. यामुळे रोहित शर्मा इतका संतापला की त्याने नबीशी वाद घालण्यास सुरुवात केली.

About The Author