अणुस्कूरा घाटात दरड कोसळली ; वाहतुक बंद
बाजारभोगाव ( प्रतिनिधी) कोल्हापूर व रत्नागिरी जिल्ह्याला जोडणाऱ्या अणुस्कुरा घाटात शनिवारी (ता.२४ )सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास दरड कोसळल्याने वाहतुक पुर्णपणे बंद करणेत आली आहे . पोलिस प्रशासन व बांधकाम खात्याकडून रस्त्यावरील दरड बाजूला करण्याचे काम युध्दपातळीवर सुरु आहे . सांयकाळी सहा वाजेपर्यत रस्ता मोकळा होईल. असा अंदाज बांधकाम खात्याकडून व्यक्त करणेत येत आहे .घाट परिसरात रात्री पासुन पावसाचा जोर वाढला आहे .