नेत्याचा फोन अन् साहेबांनी केला“कलम” झोल

कोल्हापूर (प्रतिनिधी) शहरातील एका पोलीस ठाण्याच्या हद्दीत कौटुंबिक वादातून रविवारी मारहाणीचा प्रकार घडला होता. याप्रकरणी पोलीस ठाण्यात तिघांवर मारहाणीचा गुन्हा दाखल झाला. मात्र या गुन्हात कलम वाढावे. यासाठी एका शहरातील बड्या राजकीय नेत्यानेच ‘नियोजन’ लावत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यास फोन केला अन् चक्क वरिष्ठांच्या आदेशानेच काही तासाच पोलिसांनी कलम बदलून झोल केला. डॉक्टरांचे वैद्यकीय अहवाल येण्यापूर्वी कलम वाढवले. कलम वाढीसाठी वैद्यकीय अहवाल देण्यासाठी त्याच नेत्याने शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांना सांगितल्याचे बोले जात आहे. पोलिसांकडून‘राजकीय नेत्यासाठी पायघड्या अन् जनतेसाठी पोलीस स्टेशनच्या वाऱ्या’ असे प्रकार सध्या शहरात घडत आहेत.  समतेची शिकवण  देणाऱ्या  राजर्षी  शाहू छत्रपती महाराज यांच्या  जयंतीच्या आदल्यादिवशी पोलिसांनी केलेल्या या प्रकाराची चर्चा जोरदार सुरु आहे.

About The Author