जात-पात सोडा,ओबीसी जोडा- मिरजेतील बैठकीत नारा

सांगली (प्रतिनिधी)
11 ऑगस्ट रोजी सांगलीतील तरुण भारत स्टेडियम वर पार पडणाऱ्या ओबीसी एल्गार महामेळाव्याची जय्यत तयारी सुरू असून जिल्ह्यातील प्रत्येक तालुका गाव तसंच वाडी- वस्त्यांवर सध्या बैठकांच्या माध्यमातून ओबीसी समाजाला सदर महामेळाव्यात सहभागी होण्याचे अवाहन केले जात आहे.
दरम्यान सहा ऑगस्ट रोजी मिरजेतील कसाब हॉलमध्ये माजी महापौर मैनुद्दीन बागवान यांच्या अध्यक्षतेखाली मुस्लिम समाज बांधवांसह कुंभार,धनगर समाजाची ही बैठक पार पडली. सदर बैठकीत जात-पात सोडा ओबीसी जोडा असा नारा देत,ओबीसी समाजाच्या भविष्यासाठी आणि उन्नतीसाठी महामेळाव्यात सहकुटुंब सहभागी होण्याचे अवाहन करण्यात आले. यावेळी माजी महापौर मयुद्दीन बागवान, माजी महापौर संगीता खोत, माजी नगरसेवक विष्णू माने, उबाठा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय विभुते, माजी नगरसेवक चंदू हुलवान विठ्ठल खोत आदी मान्यवरांसह अडीचशे ते तीनशे मुस्लिम बांधव व मुस्लिम धर्मगुरू उपस्थित होते.

About The Author