मौ. वडगांवची कन्या माधुरी कांबरे हिचा समस्त ग्रामस्थांच्या वतीने सत्कार
टोप (प्रतिनिधी) मौजे वडगांव येथील प्रकाश बापू म्हादू कांबरे यांची कन्या कु.माधुरी प्रकाश कांबरे यांची तलाठी पदी निवड झाल्याबद्दल समस्त मौ. वडगांवच्या वतीने त्यांचा सत्कार समारंभ ग्रा.पं. मौ.वडगांव येथील राजर्षि छ. शाहू महाराज सभागृहात संपन्न झाला.
माधुरी कांबरे यांची तलाठी म्हणून त्यांची पंधरा दिवतापूर्वी निवड झाली असून सिंधुदूर्ग जिल्यातील कणकवली तालुक्यातील असलदे या गावी त्यांची पहिलीच पोस्टींग झाली आहे.
माधुरी कांबरे यांचे प्राथमिक शिक्षक उजळाईवाडी तर ५ वी ते १२ वी पर्यंत शिक्षण नवोदय विद्यालय कागल येथे झाले आहे. त्यानंतर त्यांनी बीएससी ऍग्री पर्यंत शिक्षण पूर्ण केले.युपीएससी तयारी दिल्ली मध्ये एक वर्ष राहून दोन अटेम्ट केले. त्यात थोडया फार मार्कसनी आल. पण अपयशान खचून न जाता त्यांनी पोष्टाची परिक्षा दिली व ड वर्गात निवड झाली. दिड वर्ष ते करत असताना त्यांनी त्यावर न थांबता परत प्रयत्न करून तलाठी परिक्षा दिली व त्यामध्ये देखील यश आल.त्यानंतर त्यांनी पोष्ट खात्यातील नोकरी राजीनामा दिला व त्यांनी सिंधूदुर्ग जिल्हा,तालुका कणकवली येथील असलदे या गावी गेल्या आठवड्यात रुजू झाल्या आहेत.त्यांना पुढील कारकीर्दीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.
सत्कार प्रसंगी सरपंच कस्तुरी पाटील, उपसरपंच रघुनाथ गोरड,संत रोहिदास सेवा भावी मंडळ अध्यक्ष व सर्व सदस्य, श्री कामधेनू दुध संस्था चेअरमन रावसो चौगुले,श्री दत्त सेवा संस्था माजी चेअरमन श्रीकांत सावंत, जय हनुमान दुध संस्था चेअरमन सतीश चौगुले,त्रिमुर्ती पतसंस्था चेअरमन मधुकर अकिवाटे , महादेव शिंदे, अविनाश पाटील, रविंद्र कांबरे, स्वप्नील चौगुले, दिलीप कांबरे, सुनिल खारेपाटणे, संदिप कांबरे,अमोल झांबरे, बजरंग काकडे, एकनाथ कांबरे, भिमराव चौगुले,नेताजी माने, विनोद शेटे,प्रकाश चौगुले, महेश कांबरे, पुजा चौगुले, जयश्री चौगुले, सुवर्णा सुतार, आण्णासो पाटील व सुनील सुतार व प्रकाश बापू कांबरे उपस्थित होते. प्रास्तविक व सुत्रसंचालन कॉ.प्रकाश कांबरे यांनी केले तर आभार महादेव शिंदे यांनी मानले.