मिरजेचा राजा श्रीमंत गजराज मंडळातर्फे शनिवार व रविवार २ दिवस महाप्रसाद

मिरज (प्रतिनिधी)
येथील मंगळवार पेठेतील मिरजेचा राजा श्रीमंत गजराज गणेशोत्सव मंडळाच्यावतीने शनिवार दि.१४ व रविवार दि. १५ सप्टेंबर असे २ दिवस महाप्रसादाचे आयोजन केल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष कुमार मोरे, उपाध्यक्ष अमित आमटे व खजिनदार जगदीश वधवा यांनी दिली.

ते म्हणाले, मिरजेचा राजा श्रीमंत गजराज गणेशोत्सव मंडळाकडून दरवर्षी विविध समाजोपयोगी उपक्रम राबवले जातात. रक्तदान, आरोग्य तपासणी बाबत शिबीर राबवणे बरोबरच भाविक-भक्तांसाठी मोठ्या प्रमाणात अन्नदान ही केले जाते. प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षीही महाप्रसादाचे भव्य आयोजन केले असून शनिवार दि.१४ व रविवार दि. १५ सप्टेंबर असे २ दिवस महाप्रसाद आयोजित केला गेला आहे. दोन्ही दिवशी १२ ते ३ या वेळेत महाप्रसाद वाटप होईल. प्रतिवर्षी महाप्रसादाचा हजारो भाविक भाविक लाभ घेतात. यावर्षी देखील योग्य व नेटके नियोजन करण्यात आले आहे. परिसरातील भाविकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळाच्यावतीने करीत असल्याचे ते म्हणाले. याप्रसंगी प्रसाद गवंडी, राज वधवा, नितीन मोरे, अक्षय शिंदे, राजेंद्र पोटे, विशाल पोटे, समर्थ गवळी व इतर सदस्य उपस्थित होते.

About The Author