मंडलिक, माने यांना विजयी करा ; राजर्षी शाहू महाराजांचे पणतू राजवर्धन कदमबांडे

कोल्हापूर ( प्रतिनिधी) मी राजर्षी शाहू महाराज व छत्रपती राजाराम महाराज यांचा रक्तामासाचा  आणि विचारांचा वारसदार आहे. ‘ ते ‘ इस्टेटीचे वारसदार होऊ शकतात, अशा शब्दात शाहू महाराजांचे पणतू राजे राजवर्धन कदमबांडे यांनी आज कोल्हापुरात आयोजित पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडली.

      यावेळी बोलताना ते म्हणाले, कोल्हापुरात १९६२ साली छत्रपती शहाजी महाराज यांच्याकडून झालेल्या दत्तक विधी विरोधातील विराट जन आंदोलनाचा संदर्भ देऊन ते म्हणाले,  विद्यमान शाहू महाराज हे राजर्षी शाहू महाराज व श्रीमंत छत्रपती राजाराम महाराज यांचे वारसदार होऊ शकत नाहीत. ते केवळ इस्टेटचे वारसदार होऊ शकतात.

  श्रीमंत छत्रपती राजाराम महाराज हे राजर्षि शाहू महाराजांचे वारसदार आहेत. मात्र आत्ताचे श्रीमंत शाहू छत्रपती महाराज हे छत्रपती राजाराम महाराजांचे वारसदार नाहीत. प्रिन्सेस पद्माराजे यांचा मुलगा म्हणून या गादीवर माझा हक्क होता. राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांचा पणतू आहे. त्यामुळे मीच राजर्षि शाहू महाराजांचा वारसदार आहे. कोल्हापूरशी माझा पूर्वापार ऋणानुबंध आहे. जूना राजवाडा येथे माझे वास्तव्य होते.

   मी राजर्षि शाहू महाराजांचा वारसदार या नात्याने कोल्हापूरच्या जनतेला आवाहन करतो की,महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक व  धैर्यशील माने या दोन्ही उमेदवारांना  निवडून द्यावे. 

उमेदवार शाहू महाराज यांनी राजर्षी शाहू महाराज यांना साजेसे काम केले नाही ,असा आरोप केला जातो याकडे लक्ष वेधले असता पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नावर बोलताना ते  म्हणाले,”

राजर्षी शाहू महाराज हे केवळ महाराष्ट्रच नाही तर अवघ्या देशाचं आराध्य दैवत आहे.त्यांचे विचार महाराष्ट्रभर नेण्याचं काम मी करत आहे.

एमआयएम पक्षाने श्रीमंत शाहू छत्रपती यांना पाठींबा दिला आहे. याबाबत विचारले असता राजे कदमबांडे म्हणाले, ” मुस्लिम सुलतानांनी हिंदूंची मंदिरे पाडली.  गेल्या विधानसभा निवडणुकीत मी धुळे मतदार संघातून निवडणूक लढविली. माझ्या विरोधात एमआयएमचा उमेदवार होता.

या पत्रकार परिषदेस सत्यजित उर्फ नाना कदम , किरण शिंदे , अरूण उर्फ बापूसाहेब निबाळकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

  • दत्तक विधी करण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यात त्यांना कुठे जागा राहिली नव्हती. त्यामुळे  त्यांच्या गादीच्या अवमानाचा विषयच येत नाही. अशा शब्दात राजे राजवर्धन कदमबांडे यांनी गादीच्या कथित अवमानाविषयी आपली भूमिका स्पष्ट केली.
  •  दत्तक वारस जनतेला मान्य नव्हता. त्यामुळे हा दत्तक विधानाचा विधी  बेंगलोरच्या बंगल्यात झाला. तो बंगला आताच्या शाहू महाराजांनी विकला.  कात्यायनीचे जंगल त्यांनी विकून टाकले असून  अनेक मालमत्ता विकण्याचा सपाटा लावला आहे.

About The Author