शाहूवाडीत दवाखान्यांच्या तपासणीसाठी मंडलनिहाय 6 पथकांची नियुक्ती

शाहूवाडी तालुक्यातील बांबवडे येथील नामांकित हॉस्पिटलमध्ये अवैधरित्या होणारे गर्भपाताचे प्रकरण जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख यांच्या नेतृत्वाखालील भरारी पथकाने नुकतेच उजेडात आणले. या धक्कादायक प्रकारामुळे तालुक्याची मान निश्चितच शरमेने खाली गेली आहे. याची शाहूवाडीचे तहसीलदार रामलिंग चव्हाण यांनी गंभीर दखल घेतली आहे. तालुक्यातील दवाखान्यांच्या तपासणीसाठी मंडलनिहाय सहा पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. यासाठी आरोग्य विभागाचीही मदत घेण्यात आली आहे.

About The Author