मिरज-बिकानेर-मिरज साप्ताहीक सुपरफास्ट एक्सप्रेसचा उत्साहात शुभारंभ

सुशांत खाडे, प्रभाकर पाटील यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थित गाडी रवाना

मिरज (प्रतिनिधी)

मिरज जंक्शन येथे बहुप्रतिक्षित मिरज ते बिकानेर साप्ताहिक सुपरफास्ट एक्सप्रेस या गाडीचा उद्घाटन सोहळा पार पडला. मिरज बिकानेर साप्ताहिक सुपरफास्ट एक्सप्रेस ही मिरज, सांगली, इचलकरंजी, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यातील प्रवाशांसाठी व व्यापारी वर्गासाठी फायद्याची व महत्त्वाची ठरणारी आहे.

या कार्यक्रमाच्या वेळी जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांचे पुत्र सुशांत खाडे, माजी खासदार संजयकाका पाटील यांचे पुत्र प्रभाकर पाटील, मध्य रेल्वे पुणे विभागीय सल्लागार समिती सदस्य किशोर भोरावत, सहाय्यक डिव्हीजन रेल्वे मॅनेजर ब्रिजेश कुमार सिंग, सिनिअर वाणिज्य मॅनेजर डॉक्टर मिलिंद हिरवे, डीएमई दीपक खोत, पी ओ एम संजय सिंग, डी इ श्री.पराग साहेब, गौतमकुमार, मिरज स्टेशन प्रबंधक जी.आर. तांदळे, मुख्य तिकीट निरीक्षक पांडुरंग मराठे, आय ओ डब्ल्यू श्री. वीरेंद्रकुमार, विद्युत निरीक्षक अक्षय कुमार व रेल्वे प्रवासी सेना चे कार्याध्यक्ष संदीप शिंदे व उपाध्यक्ष राजेंद्र पाटील झोनल सल्लागार समिती सदस्य श्री. सुकुमार पाटील, ज्ञानेश्वर पोतदार, जयगोंडा कोरे, वाय. सी. कुलकर्णी, पंडितराव कराडे तात्या, आदी उपस्थित होते. ही गाडी त्रैसाप्ताहिक चालवण्यासाठी पाठपुरवठा करणार असल्याचे पुणे विभागीय सल्लागार समिती सदस्य किशोर भोरावत यांनी सांगितले.

About The Author