मिरजचा छोटा पैलवान मुंबईच्या फॅशन शो मध्ये झळकला

पै. जेसन होळकर याला गेस या अमेरिकन ब्रॅण्डसाठी रॅम्पवॉक करण्याची संधी

मिरज (प्रतिनिधी)

मुंबई येथील हॉटेल जे. डब्लू मॅरिएट या पंचतारांकित हॉटेल मध्ये २४ ऑगस्ट २१ रोजी जुनियर फॅशन शो पार पडला. यामध्ये देशभरातून ८० मुलांची निवड करण्यात आली होती. ज्युनिअर्स ब्रँड्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने हा जुनियर फॅशन शो आयोजित केला होता. एम्पोरियो अरमानी, गेस किड्स, लिवाइज, झूप टायटन या नामांकित ब्रॅण्ड्स साठी रॅम्पवॉक झाले. मिरजेच्या जेसन होळकर याला गेस या अमेरिकन ब्रॅण्डसाठी रॅम्पवॉक करण्याची संधी मिळाली.

पैलवान जेसन हा १२ वर्षाचा असून कुस्ती मल्ल आहे. मिरजेच्या कोरे तालिममध्ये तो वस्ताद मल्लू पाटील यांचेकडे सराव करत असून महाराष्ट्र आणि कर्नाटकाची अनेक मातीतील व मॅट वरील मैदाने तो लहान वयात खेळत आहे. मातीतुन थेट पंचतारांकित हॉटेलच्या रॅम्प वरती चालून जेसनने अनेक कुस्ती पट्टूसाठी आणि क्रीडापटूंसाठी एक आदर्श उदाहरण स्थापित केले आणि त्यांना मॉडेलिंगच्या जगात संधी शोधण्यासाठी प्रेरणा दिली.

About The Author