कळंबा कारागृहात मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीचा खून
कोल्हापूर (प्रतिनीधी) १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या मुन्ना उर्फ मोहम्मद अलीखान उर्फ मनोजकुमार भवरलाल गुप्ता (वय ७० ) याचा कळंबा कारागृहात निर्घृण खून करण्याचा आला आहे. पाच न्यायालयीन बंदिनीएकत्र येऊन ड्रेनेच्या लोखंडी झाकनाने डोक्यात व पाठीत मारून खून केला. रविवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारात करागरातील पाण्याच्या हौदाजवळ ही घटना घडली.
न्यायालयीन बंदी आरोपी प्रतीक उर्फ पिल्या सुरेश पाटील, दीपक नेताजी खोत, सौरभ विकास सिद्ध, संदीप शंकर चव्हाण, ऋतुराज विनायक इनामदार अशी हल्लेखोर नावे आहेत.