मिचेल सँटनरनंतर न्यूझीलंडच्या ‘या’ खेळाडूला झाली कोरोनाची लागण

 सध्या न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यात पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळली जात आहे. पाकिस्तानविरुद्धच्या चौथ्या टी-२० सामन्यापूर्वी न्यूझीलंडला मोठा धक्का बसला आहे. सलामीवीर डेव्हॉन कॉनवेला कोरोनाची लागण झाली आहे. तो शुक्रवार, १९ जानेवारी रोजी क्राइस्टचर्च येथे होणारा सामना खेळणार नाही. यापूर्वी मिचेल सँटनरला कोरोना झाला होता. त्यामुळे तो पहिला टी-२० सामना खेळू शकला नव्हता.

डेव्हॉन कॉनवेला कोरोनाची लागण झाल्याची माहिती न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने (एनझेडसी) दिली. एनझेडसीने आपल्या निवेदनात म्हटले, “काल कोविड-१९ ची टेस्ट पॉझिटीव्ह आल्यानंतर कॉनवे क्राइस्टचर्चमधील टीम हॉटेलमध्ये आयसोलेशनमध्ये आहे. रविवारी होणाऱ्या पाकिस्तानविरुद्धच्या अंतिम टी-२० सामन्यापर्यंत तो निरीक्षणाखाली असेल.” बोर्डाने कळवले की कँटरबरी किंग्जचा फलंदाज चाड बोवेसचा कॉनवेचा बदली खेळाडू म्हणून संघात समावेश करण्यात आला आहे. गोलंदाजी प्रशिक्षक आंद्रे अॅडम्स यांचीही कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे.

About The Author