अर्ध्या निपाणी शहरासह डोंगर भागातील नऊ गावे चार दिवस अंधारात

वीजेसह पाण्याचा ठणठणाट नागरिकांत संताप

निपाणी  (प्रतिनिधी) निपाणीसह परिसरात सोमवारी सायंकाळी झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने १८३ विद्युत खांब कोसळले आहेत. त्यामुळे हेस्कॉमकडून अद्यापही विद्युत खांब दुरुस्तीचे काम सुरू आहे. तर पडलेली झाडे आणि अडथळे दुरू करण्याचे सुरू असल्यामुळे निपाणीतील उपनगरासह डोंगरी भागातील 9 गावे गॅली ४ दिवस अंधारातच आहेत. तर वीजेअभावी पाणी पुरवठाही ठप्प झाला असल्याने नागरीकांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे. नैसर्गिक अपत्तीची परिस्थीती असूनही तालुका प्रशासनाने मदतीसाठी पुढाकार घेतलेला नसल्याने प्रशासना विरोधातही संताप व्यक्त करण्यात येत आहे.

शहरातील भीमनगर, रोहीणीनगर, लेटेक्स कॉलनी, महात्मा गांधी हॉस्पिटल परिसर तसेच कांही भागांमध्ये अद्यापही वीजपुरवठा ठप्प झाला आहे. सोमवारी झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे विद्युत खांबांवर पडल्यामुळे विद्युत खांब कोसळले आहेत. त्याशिवाय अनेक ठिकाणी तारा तुटून पडल्या आहेत. त्यामुळे निपाणी शहरात सोमवारी सायंकाळ पासून ते मंगळवारी सात वाजेपर्यंत वीजपुरवठा खंडित झाला होता. मात्र काही भागांमध्ये अजूनही वीज पुरवठा सुरू झालेल्या नाही. वीज पुरवठा नसल्यामुळे पाणी समस्यंचे मोठा त्रास नागरीकांना झाला आहे. तर अनेक व्यवसायीकांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच वाढत्या उकाड्यामुळे अनेक नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या व झाडे कोसळली आहेत. मात्र त्या फांद्या नगरपालिकेने अद्यापही हटवलेल्या नसून त्याकडे दुर्लक्ष केले आहे त्यामुळे नागरिकांत याबद्दल संताप व्यक्त केला जात आहे.

डोंगर भागातील गावे ४ दिवस अंधारात

या वादळी वाऱ्यामुळे डोगर भागातील बरनाळ, शिरगुपी, शेंदूर, पांगिरे-बी, बदलमुख, अंमलझरी, गोदुकुप्पी, गव्हाण, तंवंदी, गावे वीज नसल्याने ४ दिवस अंधारातच आहेत. वीज नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. यरनाळ गांवातील यात्रा पूर्ण अंधारातच करावी लागली आहे.

About The Author