अर्जुनी ता.कागल येथे जुगार अड्डयावर छापा
आठ लाखाचा मुदेमाल जप्त ; २२ जुगरींवर पोलिसात गुन्हा दाखल
मुरगूड (प्रतिनिधी) महाराष्ट्र कर्नाटकच्या. सीमेवर असणाऱ्या व निपाणी जवळील अर्जुनी ता. कागल येथे महालक्ष्मी सामाजिक कला. क्रिडा व शैक्षणिक संस्थेच्या नावाखाली सुरू असलेल्या अवैध जुगार अडयावर कोल्हापूर स्थानिक गुन्हा अन्वेषण च्या विशेष पथकाने छापा टाकून .संशयित 22 आरोपीकडून एक अलिशान गाडी चार मोटरसायकली , १४ मोबाईल हण्डसेट व रोकड असा एकूण ७ लाख ९० हजार ८४o रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला .
कोल्हापूरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने गुरुवारी मध्यरात्री अर्जुनी, ता. कागल येथे श्री. महालक्ष्मी सामाजिक कला, क्रिडा व शैक्षणीक संस्थेच्या नावाखाली अवैध जुगार व्यवसाय सुरु असलेल्या ठिकाणी अचानक छापा टाकला . त्या ठिकाणी बेकायदेशीरपणे अंदर बाहर नावाचा जुगार खेळ पैसे लावून खेळत असताना संशयित २२ जण आढळून आले. त्यांच्याकडील २ लाख २९ हजार ८४०ची रोख रक्कम, १ लाख ६० हजार रूपये किंमतीचे १४ मोबाईल हॅण्डसेट १ लाख किंमतीची महिंद्रा स्कार्पाओ गाडी असा ७ लाख ९० हजार ८४ ० रुपये चा मुद्देमाल जप्त केला.
या कारवाईत अवैध व्यवसाय चालक अनिल व्यंकटेश यादव (रा. लक्षतिर्थ वसाहत, कोल्हापूर) व्यवसाय मालक युवराज भाऊसो जाधव, (रा. खडकेवाडा) जागा मालक विनायक महादेव कामटे, (रा. अर्जुननगर, अर्जुनी) कामगार अब्दुल रहिमान मकडी, (रा. अभयनगर, सांगली) तसेच सदरचा जुगार खेळ खेळण्यासाठी आलेले .संशयित आरोपी रविंद्र बाबुराव गुरव, (रा. पांगिरे ता. निपाणी,) कैलास गणेश भिसे रा.निपाणी, मोहन मारूती चव्हाण (रा. निपाणी,) अशोक राजू शिकलगार,( रा. महालिंगपूर ता. मुधोळ) दिपक सदाशिव दौडमणी (रा. रबकवी, ता. मुधोळ) मुत्तू पंडित मैत्री, (रा. रबकवी, ता. मुधोळ) बसवराज लकमा पुजारी, (रा. नांगनूर, ता. गोकाक) राहूल रतन शिकलगार (रा. महालिंगपूर) सरफराज वाहिद बारगीर (रा. मिरज) दस्तगीर दावल शेख (रा. मिरज,) मुनाफ खली कलाल, (रा. निपाणी,)आप्पासाहेब धोंडीराम कुरळुपे (रा. अक्कोळ) ‘केशव बसाप्पा कोरवी (रा. खडकलाट) मोहन मुराप्पा शिंत्रे (रा. पडलीहाळ), अनिल सुरेश पवार उर्फ पाथरुट निपाणी . कृष्णात पाटील ( डिग्रज जि़ . सांगली )सलिम इलाई मुजावर (रा . हमालवाडी, कुपवाड) अशा २२ जणाविरुध्द मुरगूड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
ही कारवाई जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर ‘ सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ , पोलिस उपनिरीक्षक शेष मोरे , खंडेराव कोळी , शिवाजी जामदार, विलास किरोळकर , संजय पडवळ , सचिन देसाई व संतोष पाटीलं यांनी सहभाग घेतला.