पांचाळ सोनार समाज राज्य युवा संघटकपदी ज्ञानेश्वर पोतदार

मिरज (प्रतिनिधी)

सांगोला (जि.सोलापूर) येथे पांचाळ सोनार समाज महामंडळ महाराष्ट्र राज्य राज्यस्तरीय पदाधिकारी बैठक झाली. यावेळी हभप ज्ञानेश्वर (महाराज) पोतदार मिरज यांची महाराष्ट्र राज्य युवा संघटक पदी निवड करण्यात आली. बैठकीमध्ये सोनार समाजाविषयी असणाऱ्या अनेक प्रश्नावर चर्चा झाली. हे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न महामंडळच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या समवेत एकदिलाने करू असा विश्वास पोतदार यांनी व्यक्त केला.

राज्याध्यक्ष प्रकाश दादा पोतदार कराड, दिवाकर दादा पोतदार, राज्य उपाध्यक्ष, धनंजय शिरसागर संस्थापक महामंडळ, अनिल दादा पोतदार हुपरीकर कोल्हापूर, पांचाळ बोर्डिंग अध्यक्ष, रोहिणीताई कस्तुरे राज्य महिला अध्यक्ष, मनीषा तुषार पेठकर सांगली महिला जिल्हाध्यक्ष, निलेश नायगावकर धाराशिव राज्य अध्यक्ष युवा, श्याम पोतदार सोलापूर, विनायक पोतदार कुंभोज नूतन कोल्हापूर जिल्हाध्यक्ष, पुणे, बारामती, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, सातारा, कर्नाटक, खानापूर, तासगाव, कडेगाव, सांगोला, पंढरपूर या भागातून अनेक सोनार समाज पदाधिकारी, जेष्ठ बांधव यांच्या उपस्थितीत निवड जाहीर करण्यात आली.

About The Author