संत निरंकरी चॅरीटेबलच्यावतीने नावरसवाडीत रोपांची लागवड
‘वननेस वन’ या मेगा वृक्षारोपण परियोजना अंतर्गत ५५५ वृक्षांची लागवड संपन्न
सांगली प्रतिनिधी
सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज आणि पूज्य निरंकारी राजपिताजी यांचे मार्गदर्शन व पावन आशीर्वादाने संत निरंकारी मिशनच्या वतीने पर्यावरण संरक्षणाच्या उद्देशाने सन २०२१ मध्ये ‘वननेस वन’ नामक मेगा वृक्षारोपण परियोजना सुरु करण्यात आली. या परियोजनेचे लक्ष्य ‘समूह वृक्षारोपण’ (लघु वन) करुन त्याची देखभाल करणे हा होता. परिणामी आता दरवर्षी याचे स्वरूप विस्तारत चालले आहे. याच अनुषंगाने सांगली सेक्टरच्या वतीने नावरसवाडी या ठिकाणी ११ गुंठ्या मध्ये ५५५ रोपांची लागवड करण्यात आली.
सदर कार्यक्रमासाठी जालिंदर जाधव (संयोजक सांगली) तसेच सरपंच पुजा भोरे आणी महावीर भोरे व इतर पदाधिकारी, सेवादल संचालक राहुल खिलारे व सेवादल आधिकरी ,सदस्य व संत निरंकारी मंडळाचे ३००पेक्षा जास्त अनुयायी उपस्थित होते. समाज कल्याणासाठी आवश्यक अशा या परियोजनेला क्रियान्वित ठेवण्यासाठी संत निरंकारी चैरिटेबल फाउंडेशनमार्फत ग्रामीण व शहरी अशा दोन्ही क्षेत्रांमध्ये आणखी नवनवीन ठिकाणांचा समावेश करुन या महाअभियानाच्या चौथ्या टप्प्याचा शुभारंभ रविवारी ११ ऑगस्ट रोजी संपूर्ण भारतात ६०० हून अधिक ठिकाणी ‘विशाल वृक्षारोपण अभियान’ रुपात केला जात आहे. यामध्ये मिशनचे समस्त अनुयायी व स्वयंसेवक मोठ्या संख्येने सहभागी होऊन जवळपास १० लाख वृक्षांची लागवड करतील आणि आपली महत्वपूर्ण भूमिका निभावत ३ ते ५ वर्षांपर्यंत देखभाल करतील.