मिरजेतील कन्या महाविद्यालयातर्फे दत्तक गाव एरंडोली येथे वृक्षारोपण

मिरज (प्रतिनिधी)

येथील कन्या महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे मिरज तालुक्यातील एरंडोली या गावी वृक्षारोपण करण्यात आले. महाविद्यालयाने मौ.एरंडोली हे गाव ३ वर्षासाठी दत्तक घेतले आहे. या गावात राष्ट्रीय सेवा योजनेंतर्गत विविध उपक्रम राबविले जातात. पर्यावरण संवर्धन व संगोपन व्हावे या हेतूने प्रतिवर्षी विविध भागात वृक्षारोपण केले जाते. यावर्षी एरंडोली येथे वृक्षारोपण उपक्रमाची सुरुवात गावच्या प्रथम नागरिक सरपंच वासंती धेंडे यांच्या हस्ते करण्यात आली.

मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूला करंज, शिसम अशा प्रकारची ५० झाडे स्वयंसेविकांकडून लावण्यात आली. झाड लावणे हाच फक्त उद्देश नसून ती जगवण्याची जबाबदारी सर्वांची असल्याचे आवाहन रासयो कार्यक्रम अधिकारी डॉ. माधुरी देशमुख यांनी केले. या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्राचार्य डॉ. उल्हास माळकर यांचे मार्गदर्शन लाभले.

उपक्रमासाठी उपसरपंच माणिक पाटील, सदस्य सचिन पोतदार, आत्माराम जाधव, बी. के. पाटील, सचिन नलवडे, अभिजित धेंडे, सचिन तवटे, कृष्णा पाटील, जि.प. शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक वृंद यांचे अनमोल सहकार्य लाभले. रासयो कार्यक्रम अधिकारी डॉ. माधुरी देशमुख, सदस्य डॉ. मंजिरी कुलकर्णी, प्रा. रमेश कट्टीमणी, डॉ. बाबासाहेब सरगर, डॉ. संतोष शेळके, प्रा. क्षितिज जाधव, प्रा. पूजा कांबळे यांनी संयोजन केले. यावेळी मोठ्या संख्येने स्वयंसेविका उपस्थित होत्या.

About The Author