सत्यजित आबांना विजयी करा – प्राजक्ता पाटील यांची मतदारांना साद

कोतोली (प्रतिनिधी) शिवसेना उबाठा गटाचे हातकणंगले लोकसभेचे उमेदवार सत्यजीत पाटील,(आबा) यांच्या प्रचारार्थ   पन्हाळा तालुक्यातील कोतोली  जिल्हा परिषद मतदार संघात सौ.प्राजक्ता सत्यजीत पाटील यांच्या उपस्थितीत प्रचार व नागरिकांशी संवाद साधून सत्यजीत पाटील यांना विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले.

      यावेळी शिवसेना उप तालुका प्रमुख सौ. कोमल तांदळे, माजी जिल्हा परिषद सदस्या सौ संगीता पाटील, सौ. चंद्रभागा चौगुले, उप तालुका प्रमुख संभाजी जाधव, बाजीराव पाटील, विभाग प्रमुख स्वप्नील जाधव, राम तांदळे , रघुनाथ सुतार यांचेसह पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी कोतोली ते निवडे या गावात प्रचार मोहीम राबविण्यात आली.  सर्वसामान्य जनतेचा आवाज म्हणून सत्यजीत पाटील यांना विजयी करा असे आवाहन सौ कोमल तांदळे यांनी केले. तसेच सौ प्राजक्ता सत्यजीत पाटील यांनी आबांना विजयी करून विकासाची खंडित झालेली परंपरा पुन्हा एकदा सुरु करण्याचे आवाहन केले. आभार ग्राहक सेना तालुका प्रमुख बाजीराव पाटील यांनी मानले.

About The Author