रक्षाबंधन हा नाते दृढ करणारा अनोखा सण : महेश जाधव

कन्या महाविद्यालय मिरज मधील राष्ट्रीय सेवा योजना विभागाकडून मिरज आगारात रक्षाबंधन
मिरज (प्रतिनिधी)

रक्षाबंधन सण हा भाऊ-बहिणीचे पवित्र नाते दृढ करणारा सण असून या निमित्ताने कन्या महाविद्यालय मिरज मधील भगिनींनी मिरज आगारामध्ये येऊन साजरा केलेला सण आम्हाला जबाबदारीची जाणीव करून देणारी महत्वपूर्ण बाब आहे असे मत सहाय्यक वाहतूक अधीक्षक महेश जाधव यांनी व्यक्त केले ते कन्या महाविद्यालय मिरज मधील ज्युनिअर कॉलेज मधील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित रक्षाबंधन कार्यक्रमात बोलत होते.

हा कार्यक्रम मिरज आगारात साजरा केला गेला यावेळी आगार प्रमुख बालाजी गायकवाड,ट्रॅफिक इन्स्पेक्टर विशाल कुर्ले तसेच अनेक वाहक व चालकांना राखी बांधून औंक्षण करण्यात आले यानंतर कॉलेज मधील विद्यार्थीनींनी अनेक ज्वलंत व महत्वपूर्ण सामाजिक विषयावर आधारीत पथनाट्य सादर केले.यावेळी सर्वांनी या अनोख्या उपक्रमाचे व पथनाट्य सादरीकरणाचे कौतुक केले.या कार्यक्रमासाठी कॉलेजच्या उपप्राचार्या डॉ.सुनीता माळी,पर्यवेक्षिका नलिनी प्रज्ञासूर्य,राष्ट्रीय सेवा योजना विभागातील सहकारी प्रा.पांडुरंग तपासे,प्रा.दिपाली आगरे, प्रा.प्रशांत लिंबीकाई, प्रा.सुवर्णा यमगर,प्रा.अनुराधा पवार व पथनाट्य सादर करणाऱ्या विद्यार्थिनीं व राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. तुषार पाटील व विभागातील स्वयंसेविका उपस्थित होत्या.

About The Author