बहिरेश्वर गावच्या उपसरपंचपदी रंगराव कामत यांची बहुमताने निवड

कसबा बीड (प्रतिनिधी) करवीर तालुक्यातील मौजै ग्रामपंचायत बहिरेश्वर ची पंचवार्षिक निवडणूक होवून 9 महिने पूर्ण झालेत. उपसरपंचपदासाठी रोटेशन पद्धतीने वाटप करण्यात आले आहे यामध्ये सुरवातीच्या सहा महिन्यांकरिता उपसरपंच पद सुर्यकांत दिंडे यांच्या गटाकडे देण्यात आले होते.  मावळत्या उपसरपंच  शुभांगी सचिन दिंडे यांनी सहा महिन्याचा कार्यकाळ निष्कलंक पणे पार पाडून आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त झाले होते. यावेळी  उपसरपंच पदासाठी दोन अर्ज दाखल झाले होते.

 विरोधी गटाने गुप्त मतदानाची मागणी केल्यामुळे निवडणूक अधिकारी यांना गुप्त मतदान निवड प्रक्रिया राबवावी लागली. ही निवडणूक प्रक्रिया लोकनियुक्त सरपंच वंदना दिंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.

या निवडणुकीत तानाजी गोदडे यांना ५ मते पडली  त्यामुळे गोधडे यांना सलग दुसऱ्यांदा पराभवाला सामोरे जावे लागले तर कै शामराव गोदडे गटाचे  रंगराव कामत यांना ७ मते पडली व त्यांनी विजयावर शिक्कामोर्तब केले. तद्नंतर रंगराव कामत यांची निवड झालेच ग्रामसेवक सौ लाटकर यांनी घोषित केले नंतर समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी करत गूलालाची उधळण केली..तद्नंतर युवा मंडळी व नेते मंडळी यांनी आपली मनोगते व्यक्त केली व उपसरपंच रंगराव कामत यांना शुभेच्छा दिल्या.

 याप्रसंगी विद्यमान लोकनियुक्त सरपंच, सर्व सदस्य मंडळ, माजी सरपंच सुर्यकांत  दिंडे,माजी सरपंच पी आर पाटील,माजी सरपंच राजाराम सावंत , संभाजी गोसावी, संजय गोदडे,रघुनाथ वरूटे, बाबासो हावलदार, जनार्दन बचाटे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष मारूती दिंडे,आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author