भाजप हटवा, संविधान वाचवा – व्ही. बी. पाटील

 गडहिंग्लज उपविभागात संविधान बचाव दिंडी सुरु

गडहिंग्लज  (प्रतिनिधी) केंद्रातील भाजप सरकारने पुरोगामी विचारांना तिलांजली दिली़ आहे. देशाची लोकशाही धोक्यात येण्याची भिती आहे. संविधान वाचविण्यासाठी  आणि लोकशाही अबाधित राहण्यासाठी भाजप सरकार हटविण्यास सर्वांनी एकत्र यावे’, असे आवाहन ‘राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार’) कोल्हापूर जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील यांनी केले. नूल (ता. गडहिंग्लज) येथे इंडीया आघाडीसह विविध संघटनांच्यावतीने आयोजित संविधान बचाव दिंडीच्या  प्रारंभ प्रसंगी ते बोलत होते. संविधान वाचवा  दिंडीचा  तुतारी वाजवून   सुरूवात करण्यात आली.

यावेळी व्ही. बी. पाटील, संपत देसाई, धनाजी गुरव, अमर चव्हाण, आर. के. पोवार, अॅड. दिग्विजय कुराडे, विद्याधर गुरबे, रामराजे  कुपेकर आदी उपस्थित होते. बसस्थानक चौकात हा कार्यक्रम झाला. स्वातंत्र्यसैनिक दिवंगत मारुती काळे यांच्या  पत्नी अक्काताई काळे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले.

धनाजी गुरव म्हणाले, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाचा कारभार धर्मनिरपेक्ष पद्धतीने करण्यासाठी- संविधान दिले; परंतु केंद्रात सत्तेवर, असलेले भाजप सरकार हे माणूसपण नाकारणारे, सर्वसामान्यांच्या जगण्याचा हक्क हिरावून घेणारे आहे.’

संपत देसाई म्हणाले, ‘देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ व पूर्ण झाली. परंतु दहा वर्षांमध्ये सध्च्या सरकारने संविधानालाच नख लढण्याचा आणि सर्व मूलभूत हक्क, चतंत्र्यावर गदा आणण्याचा प्रयत्न सुरूला आहे.’ प्रशांत देसाई यां स्वागत केले. सरपंच प्रियांका यादव  यांच्या हस्ते २७ स्वातंत्र्यसैनिक यांच्या  प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

About The Author