साळुंखे महाविद्यालयाचे जिल्हास्तरीय युवा महोत्सवामध्ये घवघवीत यश
मिरज (प्रतिनिधी)
येथील शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे महाविद्यालय, मिरज मधील विद्यार्थ्यांनी अण्णासाहेब डांगे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, आष्टा येथे संपन्न झालेल्या शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर सांगली जिल्हास्तरीय युवा महोत्सवामध्ये लोकनृत्य, लघुनाटिका, मराठी वक्तृत्व, इंग्रजी वक्तृत्व, एकपात्री अभिनय व प्रश्नमंजुषा इत्यादी स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन घवघवीत यश संपादन केले.
महाविद्यालयाला सांघिक स्पर्धा प्रकारामध्ये लोकनृत्य स्पर्धेमध्ये प्रथम तसेच लघुनाटिका स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक प्राप्त झाला. वैयक्तिक स्पर्धा प्रकारांमध्ये कु. ऋता डांगे हिने मराठी वक्तृत्व प्रथम, इंग्रजी वक्तृत्व व एकपात्री अभिनय स्पर्धांमध्ये उत्तेजनार्थ क्रमांक प्राप्त केला. सहभागी सर्व विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे प्राचार्य मा. डॉ. अनिल पाटील, सांस्कृतिक विभाग प्रमुख लेफ्टनंट दिगंबर नागर्थवार, सांस्कृतिक विभाग सदस्य प्रा. सुहास वाघमोडे, प्रा. सौ. स्वाती हाके, प्रा. डॉ. अर्चना जाधव, प्रा. डॉ. सौ. सविता राऊत व प्रा. डॉ. दत्तात्रय नलावडे यांचे मार्गदर्शन लाभले. त्याच बरोबर चिंदू अस्वले, नामदेव भोसले व इतर नॉन टिचिंग स्टाफचे सहकार्य लाभल. सर्व स्तरातून यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे.