स्व. हिंदुराव पाटील गटाचा खा. संजय मंडलिक यांना पाठींबा

बिद्री ( प्रतिनिधी ) काळम्मावाडी धरणाचे शिल्पकार स्व. हिंदुराव पाटील व माजी खास. स्व. सदाशिवराव मंडलिक यांचे राजकारणा पलीकडे अतूट नाते होते. त्यांचा समाजसेवेचा वारसा पुढे चालविणाऱ्या खास. संजय मंडलिक यांच्या पाठीशी आपण ताकदीने उभा राहणार असून त्यांच्या विजयात स्व. हिंदुराव पाटील गटाचे योगदान महत्वपूर्ण असेल, असे मत गटनेते व बिद्री साखर कारखान्याचे माजी संचालक बाबासाहेब पाटील यांनी व्यक्त केले.
बिद्री ( ता. कागल ) येथे राधानगरी, भुदरगड व कागल तालुक्यातील कै. हिंदुराव पाटील गटाच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी खासदार संजय मंडलिक होते. यावेळी पाटील गटाच्या वतीने महायुतीचे शिंदे सेनेचे उमेदवार खास. संजय मंडलिक यांना पाठिंबा जाहीर केला.
खास. मंडलिक म्हणाले, मागील पाच वर्षांच्या काळात महापूर, कोरोना या सारख्या आपत्कालीन परिस्थितीमुळे अपेक्षित कामे होऊ शकली नाहीत. त्यामुळे मतदारसंघातील विकासकामांना निधी मिळावा म्हणून आम्ही शिंदे गटाबरोबर जाण्याचा निर्णय घेतला. गेल्या दोन वर्षांत कोट्यावधी रुपयांचा निधी या मतदारसंघात आणण्यात यशस्वी झालो.
यावेळी माजी जि. प. सदस्य भूषण पाटील, बाळासाहेब पाटील यांची भाषणे झाली. मेळाव्यास आनंदराव फराकटे, बालाजी फराकटे, नंदकुमार पाटील, संदेश पाटील, के.डी. चौगले, पांडुरंग पाटील, शंकराव पाटील, आण्णासो पोवार यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होत.

About The Author