शिवसेना उभाठा गटाचे इच्छाधारी उमेदवार सिद्धार्थ जाधव यांच्या पंचनामा यात्रेच्या टीकेला भाजपा पदाधिकाऱ्यांचे सडेतोड उत्तर

मिरज (प्रतिनिधी)

लोकनेते ना. डॉ.सुरेश(भाऊ) खाडे यांनी ग्रामीण आणि शहरी भागाचा विकास करत असताना बारा बलुतेदारांना सोबत घेऊन मिरज विधानसभा क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी अहोरात्र काम केले आहे, त्यांच्यावर टीका करत असताना सिद्धार्थ जाधव यांनी ग्रामीण भागात जाऊन जनतेशी संवाद साधावा आणि मगच दिशाभूल करणाऱ्या टीका कराव्यात असे आवाहन भाजपचे मिरज तालुका प्रभारी धनंजय कुलकर्णी यांनी केले.

मिरज विधानसभा मतदारसंघातील बौद्ध स्तूप, विविध समाज मंदिर, विविध धर्माचे धार्मिक स्थळ, मिरजेचा पवित्र दर्गा यासह दंडोबा तीर्थक्षेत्राचा विकास ना. खाडे यांनी केला आहे. अंगणवाडी , मॉडर्न स्कूल, मॉडर्न दवाखाने , राष्ट्रीय महामार्ग, रेल्वेच्या पायाभूत सुविधा अंतर्गत पायाभूत सुविधा, शेतकऱ्यांचे पाण्याचे प्रश्न, ग्रामीण भागातील रस्ते ,गटारी ,पिण्याचे पाण्याचे प्रश्न, शेतकऱ्यांच्या विजेचे प्रश्न या सर्वांच्या साठी मोठ्या प्रमाणात निधी आणून मिरज विधानसभा मतदारसंघाचा कायापालट करण्याचे काम सुरेश (भाऊ)  यांच्या माध्यमातून झाले आहे. मात्र त्यांच्यावर टीका करून आपल्याला उमेदवारी मिळेल आणि आपली कुणीतरी  दखल घेईल या केविलवाण्या प्रयत्नातून सिद्धार्थ जाधव यांनीही टाका केली आहे असे मत भाजपचे नेते किरण बंडगर आणि राजू माने यांनी व्यक्त केले.

 दहा वर्ष अज्ञातवासात असलेले सिद्धार्थ जाधव आज अचानक निवडणुका आल्यानंतर पावसाळ्यात जशा भुईछत्र्या उगवतात तसे उगवलेले दिसतात .अशा पद्धतीने टाकळीचे नेते ऑगस्ट कोरे यांनी समाचार घेतला तर सिद्धार्थ जाधव यांच्या पंचनामा यात्रेला ग्रामीण भागातील जनता विकास आभार यात्रेने उत्तर देईल असे आव्हान ढवळीचे सरपंच आकाश गौराजे यांनी केले. यावेळी सुमीत पाटील, चैतन्य स्वामी उपस्थित होते.

About The Author