बदलापूर घटनेच्या निषेधार्थ श्री.शिव-शाहू महाविद्यालयातर्फ मूक रॅली

सरूड (प्रतिनिधी) कोलकाता, बदलापूर आणि शिये प्रकरणांचा निषेध करणाऱ्यासाठी सरूड येथील श्री शिव- शाहू महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मूक रॅली काढली केला. सर्व विद्यार्थी, विद्यार्थिनी व प्राध्यापक महाविद्यालयाच्या प्रांगणात काळेफिती लावून जमले होते. ‘नराधमांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे’, ‘स्त्रियांबाबतच्या कायद्याची कठोर अंमलबजावणी झालीच पाहिजे’, ‘महिला अत्याचार प्रकरणाचा निषेध असो’ असे फलक हातात घेऊन या रॅलीस प्रारंभ झाला. महाविद्यालयातून नारायण पेठ, ग्रामपंचायत, बाजारपेठ मार्गे ही रॅली एसटी स्टँडवर येऊन विसर्जित करण्यात आली.

         यावेळी बोलताना प्रा.प्रकाश नाईक म्हणाले, महिला अत्याचाराच्या घडलेल्या घटना अत्यंत निंदास्पद असून  कोलकाता, बदलापूर आणि शिये येथील अत्याचार प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे. यावेळी विद्यार्थिनी  जान्हवी पाटील म्हणाली, लहान मुली, युवती आणि महिलांच्या सुरक्षिततेची काळजी घेण्यासाठी शासनाने त्वरित कठोर पावले उचलावीत.

         यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एच.टी.दिंडे, उप-प्राचार्य डॉ.पी.बी.पाटील, प्रा.अशोक पाटील, ॲड. मोहन पाटील, प्रा.एल.टी.आरगे, डॉ.प्रकाश वाघमारे यांच्यासह सर्व प्राध्यापक,शिक्षकेत्तर  कर्मचारी, विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने या रॅलीत सहभागी झाले होते.

About The Author