पैसा सर्वस्व न मानता यशस्वीतेसाठी विद्यार्थ्यांनी ध्येयास महत्त्व द्यावे : डॉ. शशांक कुलकर्णी
ब्राह्मण सभा इस्लामपूर आणि वाळवा तालुका ब्राह्मण संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विद्यार्थी गुणगौरव समारंभ उत्साहात
सांगली (प्रतिनिधी)
इस्लामपूर-विद्यार्थ्यांनी आपल्या करिअरचे नियोजन करताना पैशाला केंद्रस्थानी न मानता आपल्या ध्येयाला महत्त्व देणे गरजेचे आहे. असे मत भारत सरकारचे कृषी धोरण शास्त्रज्ञ डॉ. शशांक कुलकर्णी यांनी केले. इस्लामपूर येथे ब्राह्मण सभा इस्लामपूर आणि वाळवा तालुका ब्राह्मण संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विद्यार्थी गुणगौरव समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी केंद्रीय जी.एस.टी सांगली विभागाचे वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र मेढेकर होते.
डॉ. कुलकर्णी म्हणाले, शाळेतले शिक्षण जीवनाच्या शाळेत सक्षम बनवते आहे का हे तपासून पाहण्याची गरज आहे. आपल्या शिक्षणव्यवस्थेत प्रासंगिक बदल करावे लागतील. राजेंद्र मेढेकर म्हणाले, विद्यार्थ्यांनी जिद्द, चिकाटीने वाटचाल करून ध्येयसमोर ठेवून स्पर्धा परीक्षांना सामोरे गेल्यास यश हमखास मिळते. कविवर्य बा भ बोरकर यांची “देखणे ते हात” ही काव्य पंक्ती उधृत करून विद्यार्थ्यांनी नव संकल्पना निर्मितीसाठी ध्यास घ्यावा व ध्येय प्राप्ती करावी असे सांगितले.
विद्यार्थ्यांचा शालेय साहित्य व सन्मानचिन्ह देऊन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. वैभव उरुणकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. महेश कलेढोणकर यांनी पाहण्यांचा परिचय करून दिला. स्नेहल मालेकर यांनी सूत्रसंचालन केले, राजीव कुलकर्णी यांनी आभार मानले. कार्यक्रमास प्राचार्य महेश जोशी, संदीप कुलकर्णी, अवधूत कुलकर्णी, मानले.अरुण बिळासकर, प्रा. निरंजन जरंडीकर, डी. एन. कुलकर्णी, डी. एस. कुलकर्णी, मंगेश देसाई, आर. आर. कुलकर्णी, योगेश बोरकर, अविनाश देशपांडे, चिन्मय मुतालिक, अवधूत कामेरीकर, संजय हेर्लेकर, विश्वजीत कुलकर्णी, प्रमोद पडि, प्रकाश कुलकर्णी, साईप्रसाद कुलकर्णी, अमित कुलकर्णी, केदार आरे यांच्यासह अनेक महिला, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.