बेडग केंद्रस्तरीय लोकनृत्य स्पर्धेत बोलवाड शाळेचे यश

लहान गटात प्रथम तर मोठ्या गटात द्वितीय क्रमांक

मिरज (प्रतिनिधी)

सांगली जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या शालेय विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून सर्वप्रथम केंद्रस्तरावर त्यानंतर तालुकास्तरावर व शेवटी जिल्हास्तरावर विविध स्पर्धा घेतल्या जाणार आहेत. त्या अनुषंगाने मिरज तालुक्यातील बेडग केंद्रांतर्गत लोकनृत्य स्पर्धा जिल्हा परिषद शाळा विद्यानगर बेडग येथे नुकत्याच संपन्न झाल्या.

या लोकनृत्य स्पर्धेमध्ये पहिली ते पाचवी लहान गटामध्ये जिल्हा परिषद शाळा बोलवाड शाळेचा प्रथम क्रमांक आला असून या संघाची निवड मिरज तालुकास्तरीय स्पर्धेसाठी झाली तर सहावी ते आठवी मोठ्या गटामध्येही जिल्हा परिषद शाळा बोलवाडच्या संघाचा द्वितीय क्रमांक आला. बेडग केंद्रस्तरीय स्पर्धेमध्ये लहान गट व मोठ्या गटाने मिळवलेल्या यशाबद्दल केंद्रप्रमुख विजय नागरगोजे, मुख्याध्यापक पुष्पलता सदामते यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले तर सरपंच निगार शेख, उपसरपंच सचिन दादा कांबळे यांच्याकडूनही सर्व विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षक अमोल माने यांचे अभिनंदन करण्यात आले.

About The Author