खंडेराजुरीत तरुणीची आत्महत्या ; तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल

गावातीलच तरुण छेडछाड करून त्रास देत असल्याने युवतींनी केली आत्महत्या

मिरज (प्रतिनिधी)

गावातीलच तरुण छेडछाड करून त्रास देत असल्याने मिरज तालुक्यातील खंडराजुरी येथे तरुणीने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची फिर्याद पोलिसात देण्यात आली आहे. याप्रकरणी मिरज ग्रामीण पोलिसांनी एका विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. उपचारादरम्यान संबंधित तरुणीचा मृत्यू झाला आहे. स्वाती रामचंद्र जाधव (वय १९) असे मयत तरुणीचे नाव असून तिचे वडील रामचंद्र बाबासो जाधव यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी साहिल बबन डफेदार (वय २१, रा. खंडेराजुरी, ता. मिरज) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

साहिल मयत स्वाती जाधव या तरुणीला मागील चार-पाच महिन्यांपासून छेडछाड करून त्रास देत होता. मुलीने तिच्या वडिलांना साहिल हा गावात आणि मिरज बस स्थानक परिसरात मागे फिरत असल्याचे सांगितले होते. १६ व १७ ऑगस्ट रोजी मुलीस पुन्हा त्रास देऊ लागल्याने तरुणीने त्याच्या त्रासाला कंटाळून विषारी औषध प्राशन केले. रुग्णालयात उपचारादरम्यान तरुणीचा मृत्यू झाला आहे. मानसिक त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्याची फिर्याद पोलिसात देण्यात आली आहे. मिरज ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास करीत आहेत.

About The Author