सुमनताई खाडे यांच्याकडून वारकऱ्यांना रेनकोट वाटप

मिरज (प्रतिनिधी)  विठुरायाच्या ओढीने आषाढी वारीसाठी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झालेल्या  वारकऱ्यांना राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेशभाऊ खाडे यांच्याकडून रेनकोटचे वाटप करण्यात आले. महाराष्ट्रात  सर्वदूर पावसाच्या सरी बरसत आहेत. या पावसापाण्यातून पंढरपूर वारीला पायी निघालेल्या वारकऱ्यांना हे रेनकोट वाटप करण्यात आले. त्यामुळे वारीच्या मार्गावर विविध रंगाचे रेनकोट जागोजागी दिसत होते.

मिरज तालुक्यातील विविध गावांमध्ये तसेच मिरज शहरातील विठ्ठल मंदिरसह इतर ठिकाणच्या वारकऱ्यांच्या दिंडीला सुमनताई खाडे यांनी भेट दिली. यावेळी वारकऱ्यांना रेनकोट वाटप करण्यात आले. तब्बल पाचशेहुन अधिक रेनकोट यावेळेस वाटप केले. पायी चालत जाणाऱ्या दिंडीतील वारकऱ्यांना पाऊस पाण्यापासून बचाव व्हावा याकरिता राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ सुरेशभाऊ खाडे यांच्यावतीने महिला आघाडीच्या माध्यमातून सुमनताई खाडे यांच्या हस्ते रेनकोट देण्यात आले. म्हैसाळ, पाटगाव, पायापाचीवाडी, सावळी, खंडेराजुरी, कांचनपूर, मालगाव, भोसे या ग्रामीण भागातील व मिरज शहरातील समतानगर, नदीवेस येथील चार वारकरी दिंड्यांना रेनकोट वाटप करण्यात आले.

   यावेळेस वारकरी बंधू भगिनींनी आमदार सुरेशभाऊ खाडे व  सुमनताई खाडे यांचे आभार मानले. याबाबत वारकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. रेनकोट वाटप प्रसंगी सुमनताई खाडे यांच्यासोबत महिला पदाधिकारी व वारकरी दिंडीचे विठ्ठलभक्त उपस्थित होते.

About The Author