कार्यकर्त्यांच्या सन्मानाची भूमिका घेऊनच पाठिंबा व्यक्त केला जाईल: युवा नेते उत्तम पाटील

निपाणी ( प्रतिनिधी)
विधानसभा निवडणुकीत आपण स्वतंत्रपणे लढलो होतो. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस व भाजपाच्या वरिष्ठ नेते मंडळींकडून आपणाशी संपर्क सल्ला जात आहे. निवडणुकीत मदत करण्याची मागणी होत आहे. मात्र आपण कोणालाही निर्णय न देता कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन यांची मते जाणून त्यांच्या निर्णयानुसारच जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्याशी चर्चा करून कार्यकर्त्यांनी केलेल्या सूचना व कार्यकर्तना सन्मान मिळण्यासाठी जी भूमिका घेतली ती मांडून निर्णय घेणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते उत्तम पाटील यांनी पत्रकार परिषद माहिती दिली. शुक्रवारी रात्री स्तवनिदी येतील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यानंतर आयोजित पत्रकर परिषदेत ते बोलत होत
पुढे बोलताना पाटील म्हणाले; कार्यकर्त्यांनी अनेक गोष्टींचा उहापोह केला आहे. कार्यकर्त्यांना सन्मानाची वागणूक गरजेचे आहे. कार्यकर्त्यांची होणारी घुसमट थांबविणे गरजेचे आहे. या सर्व चर्चा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्यासमोर मांडल्या जाणार आहेत. त्यांच्या निर्णयानुसार राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्याशी भेट घेऊन पुढील काही दिवसात कार्यकर्ताचा व्यापक मेळावा घेऊन योग्य ती भूमिका मांडली जाईल . या मेळाव्यात अंतिम निर्णय होणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.
यावेळी बोलताना माजी आमदार सुभाष जोशी म्हणाले ; सर्व लोकांची मते आहेत राष्ट्रवादी पक्ष हा इंडिया आघाडीतील महत्त्वाचा भागीदार असल्याने देशात जसे इंडिया आघाडीने काँग्रेसला पाठिंबा दिला आहे. त्याप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पण काँग्रेसचे उमेदवार प्रियांका जारकीहोळी यांना पाठिंबा द्यावा असा बहुतेक कार्यकर्त्यांचा सूर आहे. त्यामुळे उत्तम पाटील हे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्याबरोबर सविस्तर चर्चा करून जाहीर सभा घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्त्यांची भूमिका स्पष्ट करतील. मेळाव्यात सतीश जारकीहोळी, प्रियांका जारकीहोळी यांच्या उपस्थितीत पाठिंबा व्यक्त करतील. कार्यकर्त्यांनी उत्तम पाटील यांच्यावर जबाबदारी दिल्याने शरद पवार यांच्याशी चर्चा करून योग्य तो निर्णय जाहीर करतील.
यावेळी अशोककुमार असोदे म्हणाले कार्यकर्त्यांनी सन्मानपूर्वक भूमिका घेण्याची जबाबदारी उत्तम पाटील, माजी आम. प्रा. सुभाष जोशी यांच्यावर सोपवली आहे त्यानुसार येत्या दोन दिवसात निर्णय देतील.
यावेळी गोपाळ नाईक राजू पाटील दिलीप पठाडे नगरसेवक दत्ता नाईक शौकत मनेर सुनील शेलार विशाल गिरी संजय पावले बाळासाहेब सूर्यवंशी इम्रान मकानदार शिरीष कमते यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

About The Author