अंगणवाडी कर्मचारी संघ मंगळवारी महामार्ग रोखणार
मानधनवाढीसह अन्य मागण्यांसाठी अंगणवाडी सेविका व मदतनिसांनी पुकारलेल्या बेमुदत संपाच्या पार्श्वभूमीवर शासनाने संपाकडे दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ मंगळवारी (दि.23) कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी संघाने महामार्ग रोखण्याचा निर्णय घेतला आहे. अंगणवाडी कर्मचारी युनियनच्या वतीने संपाची तिव—ता वाढविण्यात येणार असून, दि. 24 जानेवारीला मंत्रालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. गुरुवारी संपाचा 46 वा दिवस होता.