लक्षतीर्थ वसाहतीमध्ये तणाव ; बेकायदेशीर बांधकाम काढण्यास नागरीकांचा विरोध

पोलीसांकडून शांततेचे आवाहन

कोल्हापूर ; (प्रतिनिधी)

  कोल्हापूर येथील लक्षतीर्थ वसाहतीतील धार्मिक स्थळाचे बेकायदेशिर बांधकामावर करवाई करण्यासाठी गेलेल्या महानगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाच्या कर्मचाऱ्यांना स्थानिक नागरीकांनी विरोध केला. संबधित समाजाच्या महिलांनी रस्त्यावर ठाण मांडला. त्यामुळे तणाव अधिकच वाढत गेला. यावेळी पोलीसांना मोठा बंदोबस्त या ठिकाणी तैणात केला होता. पोलीसांनी संतप्त जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र जोपयंर्त कारवाई थांबत नाही, तोपर्यत येथून हलणार नाही अशी भूमिका समाज बांधवांनी घेतली. दुपारी बारा वाजता काही लोकांनी महापालिका कार्यालयाच्या आवारात ठिय्या आंदोलन केले.  

  कोल्हापूर शहराला लागूनच असलेल्या लक्षतीर्थ वसाहत येथील बेकारदेशिर धार्मिक स्थळाचे बांधकाम पाडण्याचे न्यायालयाने आदेश दिले आहेत. त्यानुसार चोख पोलीस बंदोबस्तात हे बांधकाम उतरवण्याची तयारी महानगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी व नगररचना विभागाच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी सकाळी जोरदार तयारी केली होती. ३ जेसीबी मशिन, पाच ते सहा डंपर, बॅरेकेटर, अग्नीशमन दलाचा बंब आणि दीडशे ते दोनशे पोलीस कर्मचारी असा फौजफाटा सकाळी ७.३० वाजता लक्षतीर्थ वसाहत येथे दाखल झाला.

   बेकायदेशिर बांधकाम पाडण्याची तयारी सुरू केली. बांधकाम पाडण्यासाठी महापालिकेचे लोक आल्याची माहिती मिळाल्यानंतर समाजबांधव एकत्र आले. त्यांनी बांधकाम पाडण्यास विरोध केला. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी न्यायालयाचा आदेश असल्याचे सांगितले. मात्र तरीही त्यांचे समाधान झाले नाही. आमच्या अंगावरून जेसीबी घाला. पण बांधकाम पाडू नका’ अशी भूमिका महिलांनी घेतली. महिला धार्मिक स्थळाच्या बाहेर रस्त्यावर बसल्या. तर पुरुष मंडळी त्या धार्मिक स्थळात जाऊन बसले. आम्ही हे बांधकाम पाडू देणार नाही,अशी भूमिका घेतली.

    बेकायदा बांधकाम पाडण्यासाठी होत असलेला विरोध त्यानंतर येथे सुरू असणारा आरडा ओरडा यामुळे तणाव अधिकच वाढत होता. पोलीसांनी लोकांना शांत राहण्याचे आवाहन केले. अप्पर पोलीस अधिक्षक जयश्री देसाई, शहर पोलीस उपअधीक्षक अजित टिके, पोलीस निरीक्षक तानाजी सावंत, रविंद्र कळमकर यांच्यासह अधिकारी  येथे दाखल झाले. पोलीस अधिकाऱ्यांनी नागरीकांची समजूत घातली, मात्र जोपर्यर्ंत अतिक्रमण विरोधी पथकाची कारवाई थांबत नाही, तोपर्यंत आम्ही येथून उठणार नाही, अशी भूमिका समाजबांधवांनी घेतली होती.

About The Author