मिरजेतील भाजपाची दहीहंडी तासगावच्या शिवाजी युवक गोंविदा पथकाने पटकावली
पालकमंत्री डॉ.सुरेशभाऊ खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुशांत खाडेंचे उत्तम नियोजन ; दहिहंडी पाहण्यास हजारोंची गर्दी
मिरज (प्रतिनिधी)
मिरजेत आयोजित भाजपाच्या दहीहंडी स्पर्धेत तासगावच्या शिवाजी युवक गोविंदा पथकाने सात थर लावून दहीहंडी फोडली. या संघाने १ लाख ५५ हजार ५५५ हजारांचे प्रथम क्रमांकाचे बक्षिस पटकावले. विजेत्या गोविंदा पथकास राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेशभाऊ खाडे यांच्याहस्ते पारितोषिक प्रदान करण्यात आले.
आ.सुधीरदादा गाडगीळ, भाजपचे युवा नेते सुशांत खाडे, रयत क्रांतीचे आ. सदाभाऊ खोत, आ. गाोपिचंद पडळकर, पृथ्वीराज देशमुख, राजाराम गरूड, मनोजबाबा शिंदे, सुरेश आवटी, निरंजन आवटी, योगेंद्र थोरात, संदीप आवटी, वैभव नलवडे, सागर वडगावे, अमित कांबळे, बाबासाहेब आळतेकर, विक्रांत पाटील, जयगोंड कोरे, अजिंक्य हंबर, गजेंद्र कुल्लोळी, गणेश माळी, उपस्थित होते.
जिल्ह्याचे पालकमंत्री ना.डॉ.सुरेशभाऊ खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली युवा नेते सुशांतदादा खाडे यांनी या दहीहंडीचे आयोजन केले होते. येथे दंहीहंडीचे नेटके संयोजन करण्यात आले होते. लोकप्रीय टीव्ही मालिकेत संत बाळुमामांची भूमिका साकारणारे सुमित पुसावळे यांची उपस्थितीत लक्षवेधी होती. प्रेक्षकांतून बाळुमामाच्या नावानं चांगभलंच्या घोषणांनी देण्यात आल्या. डान्स इंडिया डान्स फेम मराठी कलाकार ऋतुजा जुन्नरकर यांच्या नृत्याचा कार्यक्रमाला प्रेक्षकांनी दाद दिली. घरोघरी मातीच्या चुली, रंग माझा वेगळा फेम रेश्मा शिंदे तसेच सुप्रसिध्द निवेदिका दीप्ती हलवाई यांचे निवेदन प्रेक्षकांमध्ये उत्साह निर्माण करणारे होते. ऑलीम्पिक नेत्रदीपक आतषबाजी, लेझर शो, मुंबई डान्स ग्रुप यांच्या कार्यक्रमास प्रेक्षकांनी प्रतिसाद दिला.
मराठी गाणी, शिवाजी महाराजांचा इतिहास दाखविण्यात आला. शिवाजी महाराज की जय घोषणा, प्रेरणामंत्री यामुळे प्रेक्षकांमध्ये नावचैतन्य निर्माण झाले. या दहीहंडी सोहळ्यास हजारोंच्या संख्येने प्रेक्षक उपस्थित होते. स्पर्धेत निमंत्रीत चार गोविंदा पथक सहभागी झाले होते. शिवाजी युवक गोविंदा पथक तासगाव, शिवकृपा गोविंदा पथक गव्हाण, भैरवनाथ गोविंदा पथक जावळी सातारा, श्री दत्त आंबरेश्वर गोविंदा पथक औरवाड हे गोविंदा पथक सहभागी झाले होते.
प्रत्येक गोविंदा पथकाने प्रथम सलामी दिली. त्यानंतर चिठ्ठी टाकून प्रथम तासगाव गोविंदा पथक, द्वितीय गव्हाण गोविंदा पथक, तृतीय औरवाड गोविंदा पथक आणि चौथा नंबर जावळी येथील गोविंदा पथक असे क्रमांक देण्यात आले. तासगावच्या शिवाजी युवक पथकाने पहिल्या प्रयत्नातच ७ थर लावून मिरजेच्या मानाची दहीहंडी फोडून जल्लोष केला. दहीहंडी फोडल्यानंतर सर्वत्र नेत्रदीपक आतषबाजी आणि लेझरशो यामुळे आसमंत उजळून निघाला होता. पहिल्या क्रमांकाचे बक्षिस राज्याचे कामगार मंत्री डॉ. सुरेशभाऊ खाडे यांच्याहस्ते देण्यात आले. दहीहंडी सोहळा अलोट गर्दीमध्ये पार पडला. मिरज हायस्कूलचे क्रीडांगणावर हा सोहळा पार पडला. महिलांसाठी बसण्याची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती. अतिशय शिस्तबध्द पध्दतीने हा सोहळा पार पडला. या दंहीहंडी सोहळ्यासाठी मिरज शहर व ग्रामीण भागातून हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते.