निर्णय पक्का केला असून आता निवडणूक लढवणारच – प्रा. मोहन वनखंडे
पालकमंत्री खाडे यांना राज्यपाल करावे ; पक्ष मलाच उमेदवारी देणार असल्याचा विश्वास केला व्यक्त
मिरज (प्रतिनिधी)
आगामी 2024 ची मिरज विधानसभा निवडणूक लढवण्याचा माझा निर्णय पक्का आहे. आता कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नाही. मी लढवणारच आहेच. भाजपा कडून उमेदवारी मागितली असून भाजप उमेदवारी दिली अशी माझी अपेक्षा आहे, मात्र अन्य पक्षाकडून निवडणूक लढवायची किंवा नाही, ह्याबाबत ज्या- त्यावेळी वेगळी प्रेस घेऊन सांगू अशी प्रतिक्रिया भाजपाचे नेते प्राध्यापक मोहन वनखंडे दिली आहे. मिरज मध्ये वनखंडे हे प्रसार माध्यमांशी बोलत होते.
ते पुढे म्हणाले, पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांना भविष्यात राज्यपाल सारखं मोठं पद मिळावं अशी आमची अपेक्षा आहे. मात्र मिरज मधून भाजपाकडून मी इच्छुक असून त्याबाबत पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. नक्कीच पक्ष माझ्या नावाचा विचार करेल, हा विश्वास आहे.
पुढे ते म्हणाले, ज्यांच्यासाठी पंधरा वर्षे अहोरात्र झटलो, मात्र त्यांनी मला टाकून दिलं. मला आणि माझ्या कुटुंबियांना भरपूर त्रास देण्यात आला. हेतुपरस्पर अडचणीत आणण्याचा वेळोवेळी प्रयत्न केला गेला. पण अडचणीच्या काळात माझ्या पाठीशी भक्कम राहणारे जनस्वराज्य पक्षाचे नेते आणि माजी मंत्री विनय कोरे आणि समीत कदम यांना मी कधीही विसरणार नाही. कायम त्यांच्यासोबत असणार असेही प्रा. वनखंडे यांनी यावेळी सांगितलं.