सुर्याची सोनेरी किरणे अंबाबाईच्या गळ्यापर्यत पोहचली 

कोल्हापूर (प्रतिनिधी): करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील किरणोत्सवाच्या दुसऱ्या  दिवशी मावळत्या सुर्याची सोनेरी किरणे देवीच्या गळ्यापर्यतच पोहचली त्या नंतर घाट होऊन देवीची कर्पूर आरती करण्यात आली.

       उतरण कालखंडामधला किरणोत्सव योग्य पद्धतीने झाला वातावरण स्वच्छ हवेतील धुलीकण कमी अपेक्षित आद्रता प्रखर सूर्य किरणे हे आजच्या किरणोत्सवाचं वैशिष्ट्य आहे, संध्याकाळी मावळतीची सूर्यकिरणे सहा वाजून तेरा मिनिटांनी कटंजन पर्यंत आली सहा वाजून १४ मिनिटांनी चरण स्पर्श केला 6 15 ते 6 16 यादरम्यान गुडघ्यापासून कमरेपर्यंत वर सरकली सहा वाजून 17 मिनिटांनी खांद्यापर्यंत आली आणि सहा 17 ते 6 18 या दरम्यान चेहऱ्यावरती होऊन येऊन देवीच्या डावीकडे लुप्त झाले.  आजच्या किरणांचे एक वैशिष्ट्य म्हणायला लागेल जी 12 ते 13 वर्षांमध्ये महालक्ष्मीच्या गाभाऱ्यामध्ये तीव्रता मिळाली नव्हती तेवढी तीव्रता आज पाहायला मिळाली म्हणजे ज्यावेळेला देवीची किरणे गुडघ्यापर्यंत गेले त्यावेळेला सूर्यकिरणांची तीव्रता 96 ते 110 लक्ष या दरम्यान होते अशा पद्धतीने आजचा  किरणोत्सव योग्य पद्धतीने अपेक्षेप्रमाणे झाला.

About The Author