महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष हा राज्यभरात पोहोचलेला असून आगामी विधानसभेला सच्चा कार्यकर्त्याला संधी – संजय सोनवणे

सांगलीतील सर्व मतदारसंघात तगडे उमेदवार देण्याचे केले सूतोवाच

मिरज (प्रतिनिधी)

महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष हा सर्वसामान्यांचा पक्ष असून तो संपूर्ण राज्यभरात पोहोचलेला आहे. आगामी विधानसभेला सच्चा कार्यकर्त्याला संधी देण्यास आमचा प्राधान्य राहील. महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी उमेदवार देण्याचा आमचा मानस असून सांगली जिल्हयातील आठही विधानसभा मतदारसंघात उमेदवार देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक अध्यक्ष संजय सोनवणे म्हणाले. पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यादरम्यान मिरजेत आले असता ते आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

ते पुढे म्हणाले, आंबडेकरी चळवळीत सक्रिय राहून सारा महाराष्ट्र मी पिंजून काढला आहे. विविध योजनांच्या माध्यमातून आजचा युवक पुढे यावा यासाठी पक्ष अग्रक्रम देत आला आहे. सर्व जाती-धर्माचे तरुण पक्षाचे घटक आहे. आगामी विधानसभा आम्ही पूर्ण ताकदीने लढणार आहोत. लवकरच आमची पहिली यादी जाहीर केली जाणार आहे. सांगलीतील सर्व मतदार संघात आम्ही तगडे उमेदवार देणार आहोत. यासाठी आमची चाचपणी सुरु आहे. मात्र या सर्वात सच्चा कार्यकर्त्याला आम्ही प्राधान्य देणार आहोत.

ते पुढे म्हणाले, महायुती अथवा महाविकास आघाडीला आम्ही पाठिंबा देण्याचा प्रश्नच नसुन विधानसभेला आम्ही स्वबळावर लढणार आहोत. लोकसभेदरम्यान सांगलीतील आमच्या जैलाब शेख या पदाधिकाऱ्याने आम्हाला काहीच न सांगता विशाल पाटील या अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला होता. त्यांना त्याक्षणी पदावर दूर केल्याचे सोनवणे म्हणाले. नवे जिल्हाध्यक्ष महेंद्र गाडे यांना आम्ही दिलेल्या संधीचे ते नक्कीच सोने करतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. याप्रसंगी सोलापूरचे जिल्हाध्यक्ष महेंद्र जाधव, अरविंद कांबळे, बकश बेपारी, शाबुद्दीन शेख, महबूब शेख, अकबर सय्यद, दिलावर बुजरूक, बबन हलगुरे, नाजमीन मोमीन, अस्मिता गाडे, यास्मिन मुश्रीफ, सुमन वाघमारे यांचेसह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

About The Author