मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी पालकांनी सजग राहण्याची गरज – डॉ. रोडे
सरूड (प्रतिनिधी) विद्यार्थ्यांचा सर्वांगिणविकास साधायचा असल्यास मातापालकांनी अधिक सजग राहणे आवश्यक आहे. असे प्रतिपादन डॉ. धनश्री रोडे यांनी केले. सरूड ता. शाहूवाडी येथे इंदिरा गांधी हायस्कूलमध्ये सखी सावित्री व माता पालक संघ सभेत त्या बोलत होत्या.
यावेळी पुढे बोलताना सौ. पाटील म्हणाल्या की, टीव्ही.व मोबाईलचा वापर कमी करावा, मुले मोबाईल वापरताना त्यांच्यावर लक्ष ठेवावे. मुलानी स्वतःचे संरक्षण स्वत:करण्याचा प्रयत्न करावा .
मुख्याध्यापक जी.एस.पाटील म्हणाले की, मुलींनी आत्मनिर्भर होऊन स्वतःचे रक्षण स्वतः करण्याचे धाडस दाखवणे सध्या काळाची गरज आहे. शाळेमध्ये विद्यार्थी हिताचे उपक्रम राबवत असलेले संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार बाबासाहेब पाटील तसेच संचालक युवराज पाटील यांनी कौतुक केले आहे.