नव्या पिढीने गांधीजी व शास्त्रींचा आदर्श घ्यावा – प्रा. एन.डी.बिरनाळे
गुलाबराव पाटील शैक्षणिक संकुलात म. गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी
मिरज (प्रतिनिधी)
सत्य व अहिंसक मार्गाने म. गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने देश स्वतंत्र केला. म. गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांचे स्वातंत्र्य चळवळीतील योगदान लक्षवेधी आहे. शस्त्रापेक्षा अहिंसेची ताकदच शाश्वत आहे. नव्या पिढीने म. गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन सत्य व अहिंसक मार्गाने देशसेवा करावी. गुलाबराव पाटील आणि पृथ्वीराज पाटील यांनी संस्थात्मक नेटवर्क उभे करुन म. गांधी व लालबहादूर शास्त्रींचा विचार मजबूत केला आहे. त्यामुळे जनकल्याणकारी कार्य होत आहे, असे प्रतिपादन प्रा. एन.डी.बिरनाळे यांनी केले. गुलाबराव पाटील शैक्षणिक संकुलात आज महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली त्या वेळी ते बोलत होते.
संस्थापक चेअरमन पृथ्वीराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व विश्वस्त विरेंद्रसिंह पाटील आणि समन्वयक डॉ. सतीश पाटील यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. प्रारंभी प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलनाने म. गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आले. प्रास्ताविक डॉ. व्ही. पी. कुलकर्णी यांनी केले. प्रा. कबनूरकर जी. वाय. यांनी मा. गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या कार्याचा आढावा घेतला. आभार व्ही. एस. भोई यांनी मानले. सूत्रसंचालन प्रा. व्ही. पी. गायकवाड यांनी केले. या कार्यक्रमाचे आयोजन गुलाबराव पाटील कॉलेज ऑफ एज्युकेशन, मिरज यांनी यशस्वीपणे केले.
यावेळी समन्वयक डॉ. सतीश पाटील,डॉ. प्रताप भोसले, प्राचार्य डॉ सर्वश्री कराळे, डोंगरे, गायकवाड, जोशी मॅडम,उपप्राचार्य सुहास पाटील, विलास शेवाळे व सर्व शाखांचे प्रमुख व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते