मिरजेत शनिवारी रंगणार भाजपच्या भव्य दहीहंडीचा थरार

पालकमंत्री डॉ. सुरेशभाऊ खाडे आणि भाजपचे नेते सुशांत खाडे यांच्या वतीने आयोजन

मिरज (प्रतिनिधी)

जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेशभाऊ खाडे आणि भाजपचे युवा नेते सुशांतदादा खाडे यांच्या वतीने मिरजेत आज दिनांक ३१ ऑगस्ट रोजी भारतीय जनता पार्टी आयोजित भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ६ वाजता मिरज हायस्कूलच्या क्रीडांगणावर हा दहीहंडी उत्सव सुरू होणार आहे. मिरज विधानसभा क्षेत्रातील समस्त नागरिकांनी या दहीहंडी उत्सवात उपस्थित राहण्याचे आवाहन भाजपा मिरज विधानसभा क्षेत्रातर्फे करण्यात आले आहे. दहीहंडीच्या निमित्ताने येथे विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून यासाठी प्रसिद्ध सिने कलाकार उपस्थित राहणार आहेत.

पालकमंत्री डॉ. सुरेशभाऊ खाडे, माजी खासदार संजयकाका पाटील, आ. सुधीर गाडगीळ, आ. गोपीचंद पडळकर, भाजपचे नेते मकरंद देशपांडे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील, शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, प्रदेश कार्यकारणी सदस्य दीपकबाबा शिंदे म्हैसाळकर, माजी आमदार दिनकर पाटील, पृथ्वीराजबाबा देशमुख, शेखर इनामदार, संग्राम देशमुख, सत्यजित देशमुख, नीताताई केळकर, माजी नगरसेवक सुरेश आवटी, युवा नेते सुशांतदादा खाडे, सुमनताई खाडे यांच्यासह पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. उषाताई दशवंत, गीतांजली ढोपे पाटील, विक्रांत पाटील, माजी नगरसेवक निरंजन आवटी, संदीप आवटी, शिवाजी दुर्वे, पांडुरंग कोरे, गणेश माळी, अस्मिता सलगर, गायत्री कुल्लोळी, आनंदा देवमाने, सरिता कोरबू, प्राजक्ता कोरे, सुमन भंडारे, किरण बंडगर, त्रिशला खवाटे, दिलीप पाटील, मनोज मुंडगनूर, गीतांजली कणसे शालन भोई, जनाबाई पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

टीव्ही मालिकेतील बाळूमामा व घरोघरी मातीच्या चुली फेम अभिनेते सुमित पुसावळे, घरोघरी मातीच्या चुली व रंग माझा वेगळा फेम रेश्मा शिंदे, डान्स इंडिया डान्स फेम ऋतुजा जुन्नरकर, निवेदिका दीप्ती हलवाई आदी कलाकार या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. यावेळी ऑलिंपिक नेत्रदीपक आतिषबाजी व लेझर शोचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबई डान्स ग्रुप यांचा नृत्याचा कार्यक्रम होणार आहे. अशा विविध संस्कृतीक कार्यक्रमांचेही या ठिकाणी आयोजन करण्यात आले आहे.

About The Author