सरवडे येथे ट्रक-बोलेरोची समोरासमोर धडक तिघे ठार : चौघे गंभीर जखमी

सोळांकुर (प्रतिनिधी)
राधानगरी तालुक्यातील सरवडे व मांगेवाडी हद्दीतील सूर्यवंशी चव्हाण मळ्याजवळ ट्रक आणि बोलेरो गाड्यांमध्ये झालेल्या भीषण अपघातात तीन युवकांचा मृत्यू झाला असून, चारजण गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेली माहिती अशी की, मंगळवारी रात्री 12:30 वाजण्याच्या सुमारास सरवडे ता.राधानगरी येथील नदीच्या पुलाजवळ पश्चिम वळणावर ट्रक आणि बोलेरो यांच्यात समोरासमोर धडक झाली. या धडकेत बुलेरो मधील शुभम धावरे, आकाश परीट आणि रोहन लोहार, सर्वजण रा. सोळांकुर ता. राधानगरी), हे जागीच ठार झाले, तर ऋत्विक पाटील, भरत पाटील, सौरभ तेली आणि संभाजी लोहार हे चौघे गंभीर जखमी झाले आहेत.


या अपघातानंतर फिर्यादी श्री. राजेंद्र मनोहर लोहार (वय 41, रा. सोळांकुर) यांनी अज्ञात ट्रक चालकाविरोधात फिर्याद दाखल केली आहे. पोलीस ठाणे राधानगरी येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

About The Author